दर्यापूरात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे ६ नोव्हेंबरला व्याख्यान — सकल हिंदू समाज मंचतर्फे जय्यत तयारी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : प्रखर राष्ट्रवादाचा शंखनाद करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि प्रभावी वक्ते प्रा. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे येत्या गुरुवारी, दिनांक ६ नोव्हेंबर रोजी दर्यापूर येथे येत आहेत. त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन सकल हिंदू समाज मंच तर्फे करण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू आहे.

हे व्याख्यान वा. का. धर्माधिकारी शासकीय कन्या शाळेच्या पटांगणावर सायंकाळी ६ वाजता होणार आहे. देश, देव आणि धर्म या विषयांवरील प्रभावी मांडणीसाठी प्रा. कुलश्रेष्ठ देशभर आणि विदेशात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या व्याख्यानांमधून भारतीय संस्कृती, इतिहास आणि राष्ट्राभिमानाचा जागर निर्माण होतो.

गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्थानिक आयोजक प्रयत्नशील होते. अखेर त्या प्रयत्नांना यश येत असून, दर्यापूर शहरात प्रथमच प्रा. कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान होत आहे.
दर्यापूरकरांनी या विचारप्रवर्तक व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सकल हिंदू समाज मंच तर्फे करण्यात आले आहे.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!