लग्नापूर्वी नवरदेवाचा मतदानाचा संकल्प

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे लोकशाहीची जाणीव जपत एक सुंदर उदाहरण समोर आले आहे. अक्षय शिंदे या नवरदेवाने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवला.

धामणगाव रेल्वे येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असताना, अक्षय शिंदे यांचा विवाहसोहळा देखील पार पडत होता. लग्नाची तयारी सुरू असतानाच त्यांनी प्रथम मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आणि त्यानंतर विवाहाच्या विधींना उपस्थित राहिले.

नवरदेवाने बजावलेल्या या कर्तव्यदक्ष कृतीमुळे स्थानिक नागरिकांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशा जबाबदार मतदानाच्या संदेशामुळे युवकांमध्ये मतदार जागृती वाढण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!