निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी करणार? समोर आली मोठी अपडेट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी करणार? समोर आली मोठी अपडेट

 

राज्यभरात 29 महापालिकांच्या निवडणुकांची (Municipal Election) रणधुमाळी सुरू असतानाच आता जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समिती निवडणुकांच्याही (Panchayat Samiti Election) हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगातील (Maharashtra Election Commission) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यावेळी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुका जाहीर केल्या जाणार आहेत.

 

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी प्रक्रिया, चिन्ह वाटप असे टप्पे पूर्ण झाले असून आता प्रचाराला रंग चढू लागला आहे. मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिले असून, मतदान आणि मतमोजणी हे दोनच टप्पे उरले आहेत. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

Zilla Parishad Panchayat Samiti Election: आरक्षण मर्यादेतील संस्थांवर आयोगाचा भर

राज्यात एकूण 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या आहेत. यापैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये आणि 88 पंचायत समित्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे सध्या आरक्षणाच्या मर्यादेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे.

 

Zilla Parishad Panchayat Samiti Election: महापालिका निवडणुकांमुळे यंत्रणा व्यस्त

सध्या जवळपास 29 जिल्ह्यांतील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा महापालिका निवडणुकांमध्ये गुंतलेली आहे. काही महापालिकांमध्ये निर्माण होणारी तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, अतिरिक्त अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महापालिका निवडणुकांनंतर घेण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, 31 जानेवारीपूर्वी या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, त्या पार्श्वभूमीवर निवडणुकांची घोषणा लवकरात लवकर होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. एकूणच, महापालिका निवडणुकांच्या धामधुमीतच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा कधी होते, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

011973
error: Content is protected !!