पत्रकारितेचा गौरव आणि स्नेहाचा संगम; अंजनगाव सुर्जी येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान सोहळा व स्नेहपूर्ण वनभोजनाचा कार्यक्रम मंगळवारी खोडगाव रोडवरील सुधाकर टिपरे यांच्या शेतात उत्साहपूर्ण व आपुलकीच्या वातावरणात पार पडला. विविध माध्यमांत कार्यरत पत्रकारांचा गौरव, मुक्त संवाद आणि स्नेहमेळाव्यामुळे हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोराव सुने होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, अंजनगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरज बोंडे तसेच ठाकरे महाराज यांची उपस्थिती होती. याशिवाय मंचावर ज्येष्ठ पत्रकार शिवदास मते, मनोहराव मुरकुटे, विकास दामेधर, जयसिंग ठाकूर, सुलेखा दामेधर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना विभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांनी लोकशाहीतील पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. राजकारण, पोलीस आणि पत्रकार हे लोकशाहीचे तीन महत्त्वाचे आधारस्तंभ असून, पत्रकारांनी सत्य, निष्पक्षता आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्य केल्यास जनतेच्या प्रश्नांना योग्य दिशा मिळते, असे त्यांनी नमूद केले. जनभावना ओळखून जबाबदारीने लेखणी वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांत कार्यरत असलेल्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात शिवदास मते, अरुण कुलथे, मनोहराव मुरकुटे, उमेश काकड, रवींद्र वानखडे, सागर साबळे, चेतन घोगरे, सचिन अब्रूक, महेंद्र भगत, श्रीकांत नाथे, अशोक पिंजरकर, गजानन चांदुरकर, सुरेश साबळे, सघरतन सरदार, अब्दुल रहेमान, अब्दुल सईद, सुधाकर टिपरे, कुशल चौधरी, मुन्ना खान, प्रेमदास तायडे, रमेश सावळे, मंगेश इंगळे, सचिन इंगळे, पंकज हिरूळकर, सुनील माकोडे, सुशील बहिरे, मनोज मेळे, रुपेश फरकुंडे, महेश बुंदे, उषा पानसरे, सुनील पाखरे, हरिदास खंडे, युवराज डोंगरे, ज्ञानेश्वर जामनिक, शिलवंत रायबोले, अनिल तायडे, गिरीश लोकरे, संदीप वानखडे, सागर सवळे, बाबाराव खडसे, प्रताप गवई, डॉ. राहुल अहिरे आदींचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे आयोजन एम.आय.एम.चे जिल्हाध्यक्ष सय्यद मुजीब व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. राजू खान, जिया खान, सहजाद सेठ, आरिफ पटेल, सय्यद नाजीम, मोहम्मद निसार, शेख समीरुद्दीन, जुनेद खान, अख्तर अली यांनी संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज मेळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश सावळे यांनी मानले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!