-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : लोकशाहीच्या बळकटीसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मान हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून समाजाच्या आरशाचा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. बळवंत वानखडे यांनी अंजनगाव सुर्जी येथे पत्रकारांशी संवाद साधला. शुक्रवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी खासदार कार्यालय, अंजनगाव सुर्जी येथे शहर व तालुक्यातील पत्रकार व वृत्तपत्र प्रतिनिधींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार श्री. वानखडे यांनी पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेवर सविस्तर भाष्य केले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेमुळेच समाजातील दुर्लक्षित घटकांना न्यायाची वाट मिळते. अन्याय, अन्यवर्तन, शोषण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे पवित्र कार्य पत्रकार सातत्याने करत असून ही परंपरा पुढेही अखंड सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सन्मान सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार शिवदास मते व अशोक पिंजरकर यांच्यासह सुरेश साबळे, मनोहर मुरकुटे, गजानन चांदूरकर, अनंत पानझाडे, महेंद्र भगत, श्रीकांत नाथे, सुनिल माकोडे, सुधाकर टिपरे, सागर साबळे, उमेश काकड, गजेंद्र मंडलीक, सचिन इंगळे, पंकज हिरुळकर, प्रेमदास तायडे, गिरीश लोकरे, मनोज मेळे, रविंद्र वानखडे, संघरतन सरदार, अनिल गौर आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच या प्रसंगी इंजि. नितेश वानखडे (महासचिव, युवक काँग्रेस महाराष्ट्र), बाळासाहेब टोळे (संचालक, खरेदी-विक्री संघ, दर्यापूर), प्रदीप देशमुख (शहराध्यक्ष, काँग्रेस कमिटी अंजनगाव सुर्जी) आणि संजय सरोदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमुळे हा सन्मान सोहळा गौरवशाली व स्मरणीय ठरला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com










