मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, तेजस्वी घोसाळकरांना लॉटरी लागणार?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झालं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर महिला राज असणार आहे.

 

राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर (Mayor Reservation Mahanagarpalika Marathi News) करण्यात आलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलं. मुंबई आणि पुण्याचं महापौरपद खुल्या वर्गातल्या महिलेसाठी राखीव, तर छत्रपती संभाजीनगर,नवी मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळाचं महापौरपदही खुल्या वर्गातल्या महिलांसाठी आरक्षित झालं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर (BMC Mayor Reservation 2026) झालं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर महिला राज असणार आहे. दरम्यान, मुंबईतील नगरसेवकांच्या संख्याबळानूसार मुंबईचा महापौर महायुतीमधील भाजपचा होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता मुंबईसाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानं महापौरपदासाठी तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदासाठी महायुतीच्या आणखी काही महिलांची नावंही समोर येतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 2 सर्वसाधरण महिलांसाठी राखीव होता. वॉर्ड क्रमांक 2 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांच्याविरुद्ध तेजस्वी घोसाळकर यांची लढत झाली होती. या लढतीत भाजपकडून तेजस्वी घोसाळकर प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्या होत्या. (Mumbai Municipal Corporation Reservation 2026)

मुंबईसाठी असे होते आतापर्यंतचे महापौर आरक्षण- (BMC Mayor Reservation 2026)

  1. 2000 सर्वसाधारण; हरेश्वर पाटील
  2. 2002 एससी; महादेव देवळे
  3. 2005 सर्वसाधारण; दत्ताजी दळवी
  4. 2007 ओबीसी महिला; डॉ. शुभा राऊळ
  5. 2009 सर्वसाधारण महिला; श्रद्धा जाधव
  6. 2012 सर्वसाधारण; सुनील प्रभू
  7. 2014 एससी महिला; स्नेहल आंबेकर
  8. 2017 सर्वसाधारण; विश्वनाथ महाडेश्वर
  9. 2020 सर्वसाधारण; किशोरी पेडणेकर
  10. 2026- सर्वसाधारण

कोण आहे तेजस्वी घोसाळकर? (Who Is Tejasvee Ghosalkar)

तेजस्वी घोसाळकर या भाजपच्या नगरसेविका आहेत. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. 15 डिसेंबर 2025 रोजी तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली होती.

 

ठाणे महापालिकेत अनुसुचित जातीचा महापौर- (Thane Mahanagarpalika Mayor Reservation 2026)

ठाणे महापालिकेत महापौरपदासाठी आरक्षण अनुसुचित जातीसाठी खुलं करण्यात आलं असून ठाण्यात आता एससी प्रवर्गाचा महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालं. ठाण्यात सध्या अनुसुचित प्रवर्गात असलेल्या विमल भोईर आणि दर्शना जानकरांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे ठाण्यात आता नेमकं कोण महापौर होणार याकडे लक्ष असेल, मात्र ठाण्यात शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्यामुळे शिवसेनेचा महापौर होईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्केंनी व्यक्त केला आहे.

29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर, संपूर्ण यादी! (Mayor Reservation 29 Mahanagarpalika Marathi News)

अनु महापालिका महापौर आरक्षण
   
बृहन्मुंबई सर्वसाधारण महिला
ठाणे अनुसूचित जाती खुला
कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती खुला
नवी मुंबई सर्वसाधारण महिला
वसई-विरार सर्वसाधारण खुला
मिरा-भाईंदर सर्वसाधारण महिला
उल्हासनगर ओबीसी खुला
भिवंडी-निजामपूर सर्वसाधारण खुला
पनवेल ओबीसी खुला
१० पुणे सर्वसाधारण महिला
११ सांगली-मिरज-कुपवाड सर्वसाधारण खुला
१२ कोल्हापूर ओबीसी खुला
१३ पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण खुला
१४ सोलापूर सर्वसाधारण खुला
१५ नागपूर सर्वसाधारण महिला
१६ अकोला ओबीसी महिला
१७ अमरावती सर्वसाधारण खुला
१८ चंद्रपूर ओबीसी महिला
१९ नाशिक सर्वसाधारण महिला
२० मालेगाव सर्वसाधारण महिला
२१ धुळे सर्वसाधारण महिला
२२ जळगाव ओबीसी महिला
२३ अहिल्यानगर ओबीसी महिला
२४ छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण खुला
२५ लातूर अनुसूचित जाती महिला
२६ नांदेड-वाघाळा सर्वसाधारण महिला
२७ परभणी सर्वसाधारण खुला
२८ इचलकरंजी ओबीसी खुला
२९ जालना अनुसूचित जाती महिला

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप – 89शिवसेना ठाकरे गट – 65शिवसेना – 29काँग्रेस – 24 मनसे – 6 एमआयएम- 8 एनसीपी – 3 एसपी – 2 एनसीपी शप – 1 ————-एकूण- 227

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!