BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भाजपच्या रितू तावडे यांना भाजपने मुंबईच्या महापौरपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड औपचारिकता मानली जात आहे.

 

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने आपला महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे (Ritu Tawade Mumbai mayor) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुंबईच्या उपमहापौरपदी शिंदेसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी (Sanjay Ghadi) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुढील सव्वा वर्षांसाठी घाडी उपमहापौर असणार आहेत. महापौरपदासाठी काढण्यात आलेल्या आरक्षणात मुंबईचे महापौरपद (Mumbai Mayor) सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाले होते. त्यामुळे मुंबईची महापौर महिला होणार, हे निश्चित झाले होते. भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारली. रितू तावडे या महापौर झाल्या असल्या तरी आता त्यांना अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेची सत्ता चालवलेल्या आणि येथील राजकारण कोळून प्यायलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा सामना करावा लागणार आहे.

 

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये मिलिंद वैद्य, किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव आणि विशाखा राऊत या चार माजी महापौरांचा समावेश आहे. या सगळ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची प्रत्येक नस माहिती आहे. त्यामुळे रितू तावडे यांना सभागृहात ठाकरे गटाच्या या 4 माजी महापौरांच्या आरोपांना आणि शा‍ब्दिक टीकेला तोंड द्यावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर रितू तावडे यांनी महापौरपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे, पक्ष जो निर्णय घेतो, तो आम्हाला मान्य असतो. माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मी सर्वांचे आभार मानते. सर्वांनी निर्मळ आणि प्रामाणिक काम सर्वांनी करावे. मुंबईची महापौरपदी निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेक निवडून गेले आहेत. सभागृहाची गरिमा ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरुन निर्मळ आणि प्रामाणिक काम करावं अशी माझी अपेक्षा आहे, असे रितू तावडे यांनी म्हटले.

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24
मनसे – 6
एमआयएम- 8
एनसीपी – 3
एसपी – 2
एनसीपी शप – 1

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!