अमरावती महापालिकेत मित्र पक्ष आणि विरोधकांवर भाजप भारी ठरला. भाजपने एकाच फटक्यात सर्वांचे हिशेब चुकते केल्याचं मानलं जातं. AIMIM च्या पाठिंब्याने इथं ‘कमळ’ फुलले. पण त्याचा फटका पाठिंबा देणार्या उमेदवाराला बसला आहे. आता त्याच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे.
या निवडणुकीत भाजपतंर्गत आणि भाजप विरुद्ध इतर पक्ष असा कलह अनेकदा समोर आला. तरीही भाजपने महापौर पद हातचं जाऊ दिलं नाही. 22 भाजप उमेदवारांनी, ज्यातील 20 जण या निवडणुकीत पराभूत झाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवनीत राणा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी पत्र लिहिले होते. तर युवा स्वाभिमानी पक्षाने काही जागांवर भाजप उमेदवारांना पराभूत केले. त्यामुळे वाद वाढला होता.
एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांची हकालपट्टी
अमरावतीत महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाविरोधात जाऊन भाजपला समर्थन देणे एमआयएमच्या नगरसेविलेला भोवले. मीरा कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात एमआयएमच्या वतीने अमरावती महानगरपालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.
एमआयएमच्या नगरसेविका मिरा कांबळे यांनी भाजपच्या महापौर उमेदवाराला मतदान केले. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत त्यांनी पक्षादेशाचे उल्लंघन केले. मीरा कांबळे यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. एमआयएमकडून सर्व 12 नगरसेवकांसाठी अधिकृत व्हीप जारी करण्यात आला होता. तरीही कांबळे यांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन मतदान केल्याचा आरोप आहे. पक्षादेश मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा गटनेत्यांनी दिला आहे. या सर्व घडामोडीत कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द होऊ शकतं का, त्यांचा राजकीय बळी जाणार का? असा सवाल विचारल्या जात आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





