आमदार विलास भुमरे यांचं मुलासह मतदान; नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचा दावा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शनिवारी राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. दरम्यान आमदार विलास भुमरे यांनी मुलासह मतदान केल्यानं चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.

 

 

मुलाला घेऊन आमदार भुमरेंचं मतदान : शनिवारी सकाळपासून जिल्हा परिषदेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पैठण विधानसभा मतदार संघाचे आमदार विलास भुमरे आपल्या कुटुंबीयांसह पाचोड इथं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी विलास भुमरे यांनी मतदान करत असताना मुलालासोबत घेतलं. त्यांच्या बोटावर शाई लावत असताना त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला मुलाच्या बोटाला देखील शाई लावायला सांगितलं, त्यांनी ती लावली. त्यानंतर आमदार भुमरे यांनी मुलाला ईव्हीएम मशीन जवळ नेत त्यालाच ईव्हीएम मशीनचं बटण दाबायला सांगितलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानं निवडून प्रक्रियेचे गांभीर्य लोकप्रतिनिधींना नाही का? असा प्रश्न उपस्थितीत केला जातोय.

नियमाचं उल्लघंन : घटनेनं भारतीय नागरिकांना वयाच्या अठराव्या वर्षी मतदानाचा हक्क दिला आहे. मतदान करणं हा व्ययक्तिक अधिकार असून कोणाला मत दिलं हे देखील उघड करणं सक्तीचं नाही. मात्र मतदान कक्षात मतदार आणि निवडणूक अधिकारी यांच्याशिवाय अन्य कोणाला प्रवेश देणं निषिद्ध आहे. मतदान यंत्राजवळ मतदारांशिवाय कोणालाही जाण्याची परवागणी नाही. विशेषतः लहान मुलांना देखील मनाई असताना आमदार विलास भुमरे यांनी मुलालासोबत नेत मतदान केलं. या प्रकारात निवडणूक निर्णय अधिकारी गुन्हा नोंदवू शकतात. तर त्याठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यावर देखील कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो, असा नियम आहे.

नियमाचं उल्लंघन नाही : “मतदान करताना मुलाचा हट्ट होता म्हणून सोबत घेऊन गेलो. माझ्या बोटाला शाई लावल्यानंतर त्यानंही मला शाई लावा, असं म्हटल्यानंतर शाई लावली, यात काही गैर नाही. मतदान माझं मीच केलेलं आहे. त्यामुळं नियम मोडले नाहीत,” अशी प्रतिक्रिया आमदार विलास भुमरे यांनी दिली. तर आमदार भुमरे यांचे वडील खासदार संदीपान भुमरे यांनी नेमकं काय घडलं? याबाबत माहिती नसल्याचं कारण देत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

012818
error: Content is protected !!