अमरावती : वरूडच्या तत्कालीन तहसीलदारांनी प्रमाणपत्रांच्या चक्क छायाप्रतींचा आधारे जमिनीचे नियमबाह्य हक्क प्रदान केले आहे. भोगवटदार वर्ग-२ ची जमीन ही कुठल्या कायद्याअंतर्गत प्राप्त बनावट झाली, याची चौकशी न करता ती जमीन वर्ग करण्याची ‘अर्थ’पूर्ण खेळी करण्यात आली आहे. या नियमबाह्य कारनाम्यामुळे कोट्यवधींच्या महसूलला शासन मुकल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
या अनियमितेबाबत लोकविकास संघटनेने जिल्हा महा सचिव संतोष टिगणे यांनी तक्रार केली आहे. मोर्शीचे एसडीओ प्रदीपकुमार पवार यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे वरूड, मोर्शीच्या तत्कालीन तहसीलदारांनी सन २०२० ते २०२४ या कालावधीत भोगवटदार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित प्रकरणांचा चौकशी अहवाल सादर केला आहे. वरूडचे तत्कालीन तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांनी गंभीर स्वरूपाची अनियमितता केल्याचे या अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. विभागीय आयुक्त श्वेता सिंघल व जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मालठाणे यांच्यावर कार्यवाही का प्रस्तावित केली नाही, हा संशोधनाना विषय आहे.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कोणी रोखले?
वरूडचे तत्कालीन हसीलदार गजेंद्र मालठाणे यांनी जमिनीचे वर्ग करताना ‘अर्थ’पूर्ण बांधिलकी जोपासली आहे. एसडीओ प्रदीपकुमार पवार यांचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे ऑगस्ट २०२५ मध्येच सादर झालेला आहे. मात्र मालठाणे यांची ना विभागीय चौकशी झाली. ना शासन सेवेतून बडतर्फ करण्यात आले, हे विशेष!
या जमिनीच्या वर्गप्रकरणी वापरल्या बनावट प्रमाणपत्राचा छायाप्रती
एकदरा : ०५/२०२२-२०२३ (राजारामसिंग गोपालसिंग बघेल)
जामतळ : ०१/२०२२-२३ (गंगाधर विश्वनाथ भागवत)
जामतळ : ७/२०२०-२०२१ (शेख अहमद शेख चांद)
हुमणपेठ : ०७/२०२२-२०२३ (प्रमिला विठ्ठल पांडव)
हुमणपेठ : ०६/२०२२-२०२३ (रमेश चाराचंद बंमनवते)
सावंगा : २७/२०२१-२०२२ (श्यामसुंदर बिसन निंबाळकर)
पुसली : २०/२०२१-२०२२ (दीपक भानुदास नागले)
ईस्लामपूर : ०८/२०२२-२०२३ (रवींद्र मधुकर पाटणे)
लोणी : ०९/२०२१-२०२२ (शामराव रामजी पोकळे)
पांढरघाटी : २१/२०२१-२०२२ (कांता वामन जवंजाळ)
गौलखेडा : ०२/२०२१-२०२२ (मायाबाई गुणवंतराव राईकवार)
पुसली : २३/२०२१-२०२२ (अन्ना महादेवराव वन्होकार)
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com








