अमरावती:
मनपाचे नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांचा पदग्रहण सोहळा स्व.सुदाम काका देशमुख सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महापौर श्रीचंद तेजवानी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव (संघटन) तथा संजय खोडके, आ.सुलभा खोडके, गटनेते चेतन गावंडे, नगरसेवक व नगरसेविका यांची विशेष उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती मार्डीकर चांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आ. सुलभा खोडके यांनी अमरावती शहराच्या आर्थिक उन्नतीसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामांना चालना देण्याची गरज व्यक्त केली. शहरातील पायाभूत सुविधा, महिला स्वावलंकर, बचत बचत गटांचे सक्षमीकरण, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास शहराची आर्थिक प्रगती अधिक वेगाने होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच महानगरपालिकेनेही आपले स्वतःचे उत्पन वाढवण्यासाठी विशेष प्रयान करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले, अभल्या मनोगतात शहराच्या आ. संजय खोडके यांनी
सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. महानगरपालिकेच्या विविध विकास योजनांमुळे शहराच्या आर्थिक उन्नतीला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता करण्यासाठी येत्या काळात माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती व सुधारण्यासाठी शासन महानगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधून आवश्यक उपाययोजना राबवण्यात येतील, असेही स्थायी समिती सभापतींनीया प्रसंगी यश खोडके, नगरसेवक अॅड. प्रशांत देशपांडे, प्रा. संजय तीरथकर, नगरसेविका ममता आवारे, स्मिता सूर्यवंशी, प्रियंका पाटगे, मीनल सवई, नगरसेवक प्रशांत वानखडे,चंदु खेडकर, नजीम खान करीम खान, भोजराज काळे, माजी महापौर किशोर शेळके, राष्ट्रवादी अ.प.पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत ढमे, राजेश जवंजाळ, निलेश कंचमपुरे कॅप्टन निखिल जवंजाळ, सुधा ठाणेकर, जितु खोडके, उपयुक्त नरेंद्र वानखडे, विशाल कुलकर्णी, उपायुक्त योगेश पिठे, सहायक आयुक्त नगरसचिव संदिप वडूरकर सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





