राष्ट्रीय एकात्मता शिबिरातील कामगिरीअमरावती, 09 मार्च : भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार आदिकवी महर्षी वाल्मिकी युनिव्हर्सिटी, सयचूर (कर्नाटक) येथे नुकतेच राष्ट्रीय एकात्मता शिबिर पार पडले.
या शिबिरामध्ये अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमूने बारा पैकी आठ कला प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
शिबिरामध्ये सहा राज्यांच्या विविध विद्यापीठांतील एकूण १५० स्पर्धक सहभागी झाले होते. अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील ५ मुले व ५ मुली असे १० स्वयंसेवक व चमू व्यवस्थापक सहभागी झाले होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमूला १२ कलाप्रकारांपैकी कल्चरल, मोनो अॅक्टींग, सिंगिंग, इन्स्टहमेंट, स्कीट, इंडियन फेस्टिव्हल, इंडियन फोक डान्स, प्रोसेशन या आठ कलाप्रकारामध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. यामधील सिंगिंग इव्हेंटमध्ये सादर केलेल्या पोवाड्याच्या सादरीकरणावर रूपये अकरा हजारचा रोख पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे.
चमूंमध्ये शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा ऋषिकेश खरडे, भारतीय महाविद्यालय, मोर्शीचा कमलेश तंतरपाळे, सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळचा प्रणय अरुथे, नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबिडचा ओम पवार, शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, अमरावतीचा जय चत्रेश्वर, भारतीय महाविद्यालय, अमरावतीची भक्ती गायकवाड, तुळशीरामजी जाधव कला आणि विज्ञान महाविद्यालय, वाशीमची सागर आठवले, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळची सुहानी राठोड, पुंडलिक महाराज महाविद्यालय, चांदूर रेल्वेची राधिका पांडव व शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीची साक्षी स्वर्गीय यांचा, तर स्वयंसेवक व चमू व्यवस्थापक म्हणून इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगावचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वप्निल गोरे यांचा समावेश होता.

विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या सर्वोच्च यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सर्व चमू व व्यवस्थापक यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, रा.से.यो. संचालक डॉ. नीलेश कडू उपस्थित होते.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com