भव्य प्रोमो रनला अमरावतीकरांचा प्रचंड प्रतिसाद; ६०० हून अधिक धावकांचा उत्स्फूर्त सहभाग

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

“पंकज हिरुळकर प्रतिनिधी;

अमरावती आगामी “हिस्टॉरिक अहिल्यानगर मॅरेथॉन”च्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रोमो रनला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील क्रीडाप्रेमी वातावरण पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. अमरावती रोड रनर्स ग्रुप आणि अहिल्यानगर सायकलिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोमो रन पहाटे ६.०० वाजता सांस्कृतिक भवन येथून सुरुवात करण्यात आला. या उपक्रमात सुमारे ६०० हून अधिक धावकांनी सहभाग नोंदवून मॅरेथॉनबद्दलचा उत्साह स्पष्टपणे दर्शविला.

येत्या ३१ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या “हिस्टॉरिक अहिल्यानगर मॅरेथॉन”मध्ये १० कि.मी., २१ कि.मी. (हाफ मॅरेथॉन) आणि ४२ कि.मी. (फुल मॅरेथॉन) अशा विविध गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. ही मॅरेथॉन दरवर्षी भारतीय सेना, फिट इंडिया आणि अहिल्यानगर सायकलिंग क्लब यांच्या सहकार्याने आयोजित केली जाते. देश-विदेशातील अनेक नामांकित धावक या स्पर्धेत सहभागी होतात. अमरावतीतील धावकांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, या उद्देशाने प्रोमो रनचे आयोजन करण्यात आले होते.

प्रोमो रनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक धावकाला टी-शर्ट, गुडीबॅग, टायमिंग बिब यांसारखी आकर्षक साहित्य देण्यात आली. स्पर्धेनंतर सर्वांसाठी पौष्टिक नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला, ज्यामुळे सहभागी धावकांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये अमरावती रोड रनर्स ग्रुपचे सर्वेसर्वा श्री. दिलीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे योगदान दिले. रूट सपोर्ट, पायलटिंग, ट्रॅफिक कंट्रोलिंग, तसेच साहित्य वितरण यासाठी अनेक स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. यामध्ये रोशन मेघानी, रितु तलमले, अतुल कडू, जगविंदर, अमण सलुजा, राजेश कोचे, रवि बजाज, मनोज नवाणी, सचिन जयस्वाल, मंगेश पाटील, सुरज मडावी, प्रशांत सातव, डॉ. गिताजंली कढाणे, मैथिली जयस्वाल, सोनी मोटवानी, राधिका दम्माणी, सुरेंद्र गावंडे, शीतल अग्रवाल, भारती, प्रविण आगाशे, गौरव मडघे, मयुर पाबळे, विनय काळे, आनंद देशमुख, मिलिंद बेलसरे, चेतन कडू, राजेंद्र इंगोले, संजय अंबाडेकर, निखिल सोनी, ऋजूता फुके, प्रणिता निस्ताणे, अस्मिता सोनी, केदार पावगी आणि प्रज्वल पाथरे यांचा सक्रिय सहभाग होता.

या प्रसंगी आयोजकांनी अमरावतीकरांना आवाहन केले की, ३१ मे रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपल्या शहराचे प्रतिनिधित्व अभिमानाने करावे. प्रोमो रनमधील उत्साह पाहता, आगामी मॅरेथॉनला देखील मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही माहिती प्रसिद्धी विभाग, अमरावती रोड रनर्स ग्रुप कडुन प्राप्त झाली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013562
error: Content is protected !!