नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाल्यानंतर, धीरेंद्र शास्त्री यांनी रविवारी जाहीर माफी मागितली.
नागपूर : बागेश्वर बाबा यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगत घोर अवमान केल्याचा आरोप राजकीय व सामाजिक संघटनांनी केला होता. याबाबत रविवारी स्वतः धीरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबा यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर माफी मागितली. “माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा मी आहे. त्यामुळं स्वप्नात देखील महाराजांचा अवमान मी करू शकत नाही,” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
चार मूल जन्माला घालणे म्हणजे… : पाच दिवसीय रामकथा नागपुरात सुरु झाली आहे. हिंदुत्व जागृत करण्यासाठीही आवाहन करणार असल्याचं शास्त्री म्हणाले. पुढे मी देखील गृहस्थ जीवनात जाणार आहे. चार मूल जन्माला घालून त्यापैकी एक संघाला समर्पित या वाक्याचा अर्थ म्हणजे “एक सैन्याला द्या, शिक्षक बनवा, राष्ट्रप्रेमी बनवा” असा असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
“मी परवा आरएसएसच्या एका कार्यक्रमात गेलो होतो, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोललो. काहींनी माझ्या वक्तव्याला वेगळ्या पद्धतीनं प्रस्तुत केलं. मला दोषारूप केलं की महाराजांचा चुकीचा इतिहास सांगत त्यांचा अवमान केला. हिंदू राष्ट्राची ज्यांची संकल्पना आहे, त्यांच्याविरुद्ध स्वप्नातही ऐकू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना मी देखील मानतो. जर आम्ही आपसातच असे केले तर दुसऱ्यांना त्याचा फायदा मिळेल. माझ्या वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त करतो, त्यांचा अपमान मी कसा करू शकतो?” – धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर बाबा
लव जिहादविरोधात कठोर कायदा बनवा : “देशात आणि मुंबई, नागपूर, महाराष्ट्रात लव जिहादचे प्रकरणं वाढत आहेत. प्रेम करणं गुन्हा नाही. मात्र, आपली संस्कृतीचे हनन हे चुकीचे आहे. मुलींना जागृत करणार,” असं बागेश्वर बाबा म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याप्रकरणी चांगले काम करत आहेत. लव जिहादविरोधात कठोर कायदा बनवा. इन्स्टा, फेसबुकवर हिंदू मुलींना फसवतात. लव जिहाद मुक्त भारत, महाराष्ट्र व्हावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मी हिंदुत्व, हिंदवी स्वराज्यासाठी लढत आहे : “मी कुणाचाही अपमान केला नाही, धर्मांतरणचा रथ रोखयाचा प्रयत्न हे काही लोक करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या गुरुप्रति किती समर्पित होते हेच मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांची महिमा वाढावी हीच माझी भावना होती. त्यांची अवमान करण्याची कुठलीही भावना नव्हती, संतांचे विचार मी सांगितले,” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





