
मानोरा : संपूर्ण मानव जातीने जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्याची वाटचाल कशी करायची याचे उत्तम उदाहरण व आदर्श म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय, असे प्रतिपादन स्थानिक मा. सु. पा. महाविद्यालयात मातृ सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्रा. डॉ. राजगुरे यांनी केले. मातृ सप्ताह निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक महान शासिका या विषयावर दुसरे पुष्प गुंफीत असताना वरील मत व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा बालपणापासून चा प्रवास…
आपल्या व्याख्यानातून त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा बालपणापासूनचा प्रवास, त्यांनी केलेले मौलिक कार्य, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी त्यांचे योगदान, धर्मकार्य, रूढी परंपरा चा त्याग आधी अनेक विषयावर प्रा. डॉ. राजगुरे यांनी इतिहासातील विविध दाखल्यांचा आधार घेत विद्यार्थ्यांना आपल्या अनोख्या शैलीत समजावून सांगितले. व्याख्यानमाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे हे होते, तर व्यासपीठावर प्रा. डॉ. अली, क. वि. प्र. देशमुख विराजमान होते. अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांनी सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, यांचे विचार आजच्या स्त्रीला सुद्धा समजून घेणे व त्या विचारावर काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. व्याख्यानमाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक समितीचे संयोजक प्रा. डॉ. अली यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनील काळे यांनी केले. व्याख्यानमाला आयोजित करण्याकरिता सांस्कृतिक समिती सदस्य प्रा. काजळकर , प्रा. भोयर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






