
अमरावती : येथील चित्रा चौक ते पठाण चौक आणि असोरिया पेट्रोल पंप या दरम्यानचा उड्डाणपूल तसेच मालवीय चौक ते चित्रा चौक रस्ता काँक्रीटीकरण कामे ५८,४७ कोटींच्या निधीतून होत आहेत. निधीअभावी या उड्डाणपुलाची कामे रखडली, संबंधित कंत्राटदारांनी काही महिन्यांपासून कामे बंद केल्याने या भागात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात अमरावती-अचलपूर राज्य महामार्ग क्रमांक १४ वर उड्डाणपूल बांधकामाच्या निविदा २६ डिसेंबर २०१७ रोजी मंजूर करण्यात आल्यात. नागपूर येथील चाफेकर अँड कंपनीकडे या पुलाच्या निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात आली. ५८.४७ कोर्टीच्या केंद्रीय मार्ग निधीतून या उड्डाणपुलाची कामे करारनाम्यानुसार २४ महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित होते. ४ जानेवारी २०१८ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही दिले होते. मात्र, गत सहा वर्षात या उड्डाणपुलाचे कामे अपूर्ण आहेत. केवळ पिलर उभे असून रॅम्पची कामे सुरू व्हायची आहेत.
शासनाकडून देयके मिळत नाही. गतवर्षीचे देयके जुलै २०२४ मध्ये मिळाले. अद्यापही मोठ्या रकमेचे दोन देयके प्रलंबित आहेत. पिलरची कामे आटोपली असून, रॉम्प टाकणे बाकी आहे. निधी येताच उड्डाणपुलाची कामे पूर्णत्वास येईल.
चाफेकर अँड कंपनी, संचालक, नागपूर चित्रा चौकातील उड्डाणपुलाचे काम निधीअभावी रखडले, हे वास्तव आहे. या पुलाची लोखंडी कामे भरपूर व्हायची आहेत. नागरिकांच्या तक्रारी सतत वाढत आहेत. मात्र, निधी ही सर्वात मोठी अडचण ठरत आहे.
तुषार काळे, उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती
करारनामा २४ महिन्यांचा चित्रा चौकातील उड्डाणपुलाची निर्मिती ही २४ महिन्यांतच करणे करारनाम्यात नमूद आहे. २०१८ ते २०२५ अशी सहा वर्षे उजाळली आहे. शहराच्या पश्चिम भागातील रहिवाशांसाठी हा पूल महत्त्वाचा ठरणारा आहे. परंतु, निर्मितीसाठी मंजूर निधी का मिळत नाही?
ई-निविदेनुसार उड्डाणपूल निर्मितीचा रोडमॅप सुपर स्ट्रक्चर : एकूण ३२ गाळे रचना पैकी 30 मीटरचे २८ गाळे, २० मीटरचे ३ गाळे, ४० मीटरचा १ गाळा सॉलीड रॅम्प: चित्रा चौक ते नागपुरी गेट चौकाकडे १८० मीटर लांबी, नागपुरी गेट चौकामधून चित्रा चौकाकडे मधील ग्प १५० मीटर लांबी, भातकुलीकडे जाणारा डाऊन रॅम्प २३८ मीटर लांबी स्लोप रस्ता बांधकाम : एकूण ६१७५८ मीटर लांबीच्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस कमीत कमी ५.५० मीटर रुंदीत रस्त्याचे काँक्रीटीकरण, मालवीय चौक ते चित्र चौकापर्यंत एकूण ४४०,०० मीटर लांबीत रस्त्याचे काँक्रीटीकरण नाली बांधकाम: १७७५ मीटर • लांबीच्या दोन्ही बाजूस काँक्रीट नाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूस पेव्हिंग ब्लॉक बसविणे, फूटपाथवर टाईल्स, थमर्मोप्लास्टिक पेंटने मार्किंग.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






