Parbhani: ऊसाच्या हार्वेस्टर मशीनने घेतला पेट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

परभणी :- शेतातील ऊस काढत असताना अचानक हार्वेस्टर मशीनने  पेट घेतला. ही घटना रविवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परभणी तालुक्यातील नांदगाव बु. शिवारात घडली. सदर आगीत २० गुंठे क्षेत्रावरील ऊस आणि हार्वेस्टर मशीन जळून खाक झाले.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

परभणी तालुक्यातील नांदगाव बु. शिवारात हनुमान जवंजाळ यांच्या गट नंबर ३१ मध्ये ऊस काढणीचे काम चालू होते. यावेळी आणण्यात आलेल्या हार्वेस्टर मशीनने अचानक पेट घेतला. आगीत ऊस आणि हार्वेस्टर जळाले. घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन अधिकारी डि.यु. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव देशमुख, उमेश कदम, रोहिम गायकवाड, वाहन चालक संतोष पोंडाळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझविली.

FacebookWhatsapp
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013550
error: Content is protected !!