
धामणगाव रेल्वे : पैशांचा पाऊस पडेल, तुमच्या घरी चांगले दिवस येतील, असे वेगवेगळे आमिष दाखवून काही जण गंडा-दोऱ्याचा खेळ करतात; परंतु हे सर्व थोतांड आहे. अंधश्रद्धा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे. यात दोषी आढळल्यास कारावासाची शिक्षाही होऊ शकते.
जादूटोणा करणे हे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी आजही अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा व पिशाच्चबाधा आदींमुळे, तसेच भोंदूबाबाकडून सामान्य जनतेचे मानसिक, शारीरिक वा आर्थिक नुकसान व शोषण होण्याच्या घटना अनेक ठिकाणी उघडकीस येतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून याबाबत अनेकदा जनजागृतीही करण्यात आली; परंतु काहीही झाले तरी काही लोक त्याचा प्रचार-प्रसार करीत असल्याचे समोर येत आहे.
रुग्णालयापेक्षा भोंदूबाबावर भरवसा अनेकांचा आजही रुग्णालयापेक्षा भोंदूबाबावरच अधिक विश्वास असल्याचे दिसत आहे. जुन्या पिढीत हे प्रमाण अधिक आहे; परंतु नवीन पिढी आता विरोध करत आहे.
तक्रारींसाठी पुढे येणे गरजेचे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तक्रारींसाठी कोणी पुढे येत नसल्याने भोंदूबाबांचे चांगलेच फावते. तक्रारीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्याच तरतूद आहे.
सात वर्षांपर्यंत दोषींना होऊ शकते कारावास गुप्तधन मिळणार, असे सांगून काही जण फसवणूक करतात; परंतु असे विचार डोक्यातून काढून टाका. जादूटोण्याने असे काहीही होत नसल्याचे ‘अंनिस’ने सांगितले.
जादूटोणा करणे कायद्याद्वारे बेकायदेशीर चमत्काराच्या नावाखाली अमानुष, अनिष्ट, अघोरी कृत्य करणे, जादूटोणा, भूतपिशाच्चाचे प्रयोग करणे आदी कृत्य या जादूटोणाविरोधी कायद्याद्वारे बेकायदेशीर आहे. आजार बरे करण्यासाठी काळ्या जादूचा वापर आणि अशाच प्रकारच्या कृती ज्यामुळे लोकांचे अंधश्रद्धेतून शोषण होऊ शकेल, ते कृत्य गुन्हेगारी अपराध ठरवितो. काही प्रकरणांत गुन्हे देखील दाखल झाले आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






