स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा०

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

परतवाडा : विधानसभा निवडणुकीतील अपयश विसरून आता कार्यकर्त्यांनी नव्याने संघटन बांधणीच्या जोमाने कामाला लागावे. आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती, नगर परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता प्रत्येक पदाधिकारी व कार्यकत्यांनी सज्ज व्हावे, असा सल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला.

परतवाडा शहरात ४ फेब्रुवारी रोजी तालुका ग्रामीण व शहर काँग्रेस कार्यकर्ता बैठक झाली. यावेळी बबलू देशमुख म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले होते. मग दोन-तीन महिन्यात असे काय लोकांमध्ये परिवर्तन झाले की, महायुतीला विधानसभेत मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. आजही जनता महागाई, बेरोजगार अशा अनेक समस्यांनी त्रस्त असल्याचेही ते म्हणाले.

व्यासपीठावर अचलपूर बाजार समिती उपसभापती अमोल चिमोटे, रवी पाटील, महेरुल्ला भाई, राजाभाऊ टवलारकर, जयदेव गायकवाड, दीपक अग्रवाल, विनायक चौधरी, बाळासाहेब उभाड, श्रीकांत अपाले, देवेंद्र पेटकर, अहतेशाम नबील, विश्वास गवई, नाकड साहेब, कैलाश आवारे, अमोल बोरेकार, सुधीर रहाटे, नामदेव तनपुरे, श्रीकांत झोडपे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीस बाजार समिती संचालक सुधीर राहाटे, ज्ञानदेव पाटील, सरफराज, मो. अन्सार, इकबालभाई पटेल, जी. एम. खान, अजीज, अमोल बदरके, जय घोरे, कैलास कडू, सचिदानंद बेलसरे, दिनेश वानखडे उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013550
error: Content is protected !!