अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्ता गटात सहभागी असलेले संचालक अजय मेहकरे, चित्रा डहाणे, नरेशचंद्र ठाकरे, आनंद काळे आणि जयप्रकाश पटेल या पाच संचालकांविरोधातील अविश्वास प्रस्तावाला उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे विभागीय
सहनिबंधकांच्या आदेशान्वये शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी अविश्वास ठरावासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. अविश्वास पारित होण्याकरिता १४ संचालकांचे समर्थन आवश्यक असल्याने या सभेकडे लक्ष लागले आहे.
मागील आठवड्याला न्यायालयाने या प्रस्तावाला मंजुरात देत विभागीय सहनिबंधकांना विशेष सभा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या आदेशान्वये १४ फेब्रुवारीला दुपारी १:०० वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित केली आहे. त्यामुळे या विशेष सभेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
विरोधी संचालकांच्या आक्षेपावर विभागीय सहनिबंधकांकडून प्रक्रिया सुरू, जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लागले विशेष सभेच्या निर्णयाकडे लक्ष
अविश्वासाची याचिका न्यायालयाकडून स्वीकृत
अमरावतीः सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक आणि शिक्षक सहकारी बॅक वर्तुळात उच्च न्यायालयाच्या निकालानंतर खळबळ उडाली होती.
जगतापांसह १४ संचालकांनी दाखल केली होती याचिका जिल्हा बँकेचे संचालक प्रा. वीरेंद्र जगताप व अन्य १४ संचालकांनी उच्च यालयात याचिका दाखल करून अविश्वाची प्रस्तावाची परवानगी मागितली होती.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





