माजी खासदार किरीट सोमय्या पुन्हा आज अंजनगावात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें


▪️जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत पोलीस ठाण्यात करणार तक्रार
▪️सोमय्या यांचा बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माचे दाखले दिल्याचा आरोप

अंजनगाव सुर्जी : तहसील कार्यालय अंतर्गत बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्यांना मोठ्या प्रमाणात जन्म दाखले दिल्याचा आरोप करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार डॉ.किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा अंजनगाव सुर्जीला भेट देत आहेत.आज दि.6 फेब्रुवारी रोजी माजी खासदार डॉ.किरीट सोमय्या हे अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन येथे दाखल होणार असून तक्रार करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी डॉ.किरीट सोमय्या यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह अमरावती जिल्ह्यात बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्यांविषयी खळबळ उडवून दिली होती.याशिवाय, माजी खासदार सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, या बांगलादेशी रोहिंग्यांनी स्वत:ला भारतीय असल्याचे दाखवता यावे यासाठी बनावट मार्गाने कागदपत्रे मिळवून संबंधित तहसील कार्यालयातून जन्म प्रमाणपत्रे मिळविली आहेत. तसेच नोव्हेंबर 2023 मध्ये तहसीलदार आणि उपजिल्हा दंडाधिकारी यांना उशिरा जन्म दाखले देण्याचे अधिकार मिळाले होते आणि त्यानंतर 2024 मध्ये तहसीलदार आणि उपविभागीय कार्यालय स्तरावर उशिरा जन्म दाखले देण्याचे काम सुरू करण्यात आले. तर 2024 मध्ये अंजनगाव सुर्जी येथील तहसील कार्यालयात 1484 अर्ज प्राप्त झाले होते.त्यापैकी एकही अर्ज फेटाळण्यात आला नाही आणि सर्व अर्जदारांना जन्म दाखले देण्यात आले. विशेष बाब म्हणजे यामध्ये दोन तृतीयांश पेक्षा जास्त अर्जदार विशिष्ट समाजाचे होते आणि त्यापैकी बहुतांश अर्जदार हे बांगलादेशी रोहिंग्या असल्याची माहिती आहे. ते या तहसील कार्यालय अंतर्गत बेकायदेशीरपणे राहत असून त्यांनी एजंटांमार्फत बनावट कागदपत्रे मिळवून अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्ट पद्धतीने जन्म दाखले बनवले असून ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे. अशा स्थितीत याप्रकरणी पोलिस तक्रार देण्यासाठी ते स्वत: आज पुन्हा एकदा अंजनगाव सुर्जी येथे दाखल होणार आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013550
error: Content is protected !!