इविंनमधील जेनेरिक मेडिकल वर्षभरापासून कुलूपबंदच

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे रुग्णांना स्वस्त दरामध्ये औषधी उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाच्या करारानुसार खासगी जेनेरिक मेडिकलचे बांधकाम करण्यात आले होते. हे मेडिकल उभारून वर्ष उलटले मात्र ते अजूनही कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे रुग्णालयात उपलब्ध न होणारा औषधीसाठी आजही ग्राहकांना महागडी औषधी खरेदी करावी लागत असल्याचे चित्र आहे.

शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सर्वच प्रकारची आरोग्य सेवा निःशुल्क देण्यात येत आहे. यासंदर्भातील शासन निर्णयदेखील १३ ऑगस्ट २०२३ मध्ये राज्य सरकारने जारी केला होता. मोफत उपचारासोबतच रुग्णांना आवश्यक औषधीही निःशुल्कच उपलब्ध करण्यासंदर्भातील सूचनाही आरोग्य विभागाला या शासन निर्णयातून देण्यात आल्या आहेत. परंतु, तरीही अनेक वेळा रुग्णांना आवश्यक औषधी वेळेत रुग्णालयात उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना बाहेरून महागडी औषधी विकत खरेदी करावी लागतात. त्यामुळे शासन स्तरावरच शासकीय रुग्णालय परिसरात खासगी जेनेरिक मेडिकल उभारण्यासंदर्भातील करार करण्यात आला होता. या करारानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात एक वर्षापूर्वी हे मेडिकल उभारण्यात आले असले, तरी ते कुलूपबंदच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यासाठी सीएसकडून सकारात्मक पाठपुराव्याची गरज आहे.

 

२० वर्षासाठी करार झाला इर्विनमध्ये जेनेरिक मेडिकल सुरू करण्याबाबत नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अॅण्ड रिटेलिंग को-ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया या संस्थेशी २० वर्षांचा करार आरोग्य विभागाने केला आहे. या करारानुसार वर्षभरापूर्वीच जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील मेडिकलचे कामदेखील पूर्ण झाले.

भाड्याने जागा होणार उपलब्ध ?

करारानुसार शासकीय रुग्णालयात जेनेरिक मेडिकलसाठी २०० ते २५० चौरस फूट जागा कंपनीला भाड्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे २० वर्षांसाठी ही जागा या संस्थेच्या ताब्यात राहणार असून, कमी दरामध्येच ही जागा संबंधित संस्थेला उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

शासनस्तरावरील करारानुसार रुग्णालय परिसरात संबधित संस्थेला जेनेरिक मेडिकलसाठी जागा उपलब्ध केली आहे. उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातही जागा दिली आहे. ते सुरू करण्याबाबत संबधित संस्था निर्णय घेईल.

डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013550
error: Content is protected !!