विश्वसात न घेतल्याचा आरोप करत 75 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
दर्यापूर मध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची श्यक्यता : राजकीय क्षेत्रात दर्यापूर मध्ये खळबळ
दर्यापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसेना ,युवासेना , सहकार क्षेत्र व शिव सहकार आदी आघाड्यांतील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे, शिवसेना ठाकरे गटाचा दर्यापूर मतदार संघात आमदार निवडून आल्यानंतर या पक्षाचा दर्यापूर विधानसभा क्षेत्रात चांगला बोलबाला निर्माण झाला होता मात्र सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना दर्यापुरात उत आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Elgar) पक्षाचे विद्यमान आमदार गजानन लवटे हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसून कोणतेही लक्ष देत नाहीत, असा आरोप यावेळी करण्यात आला यांच्या नेतृत्वात दर्यापूर मतदारसंघात पक्षांतर्गत कार्यकारणी निवडीत व नूतन तालुकाप्रमुख निवडताना जुन्या व मजबूत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप झाला आहे यासह ज्या लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचे निवडणुकीत काम केले नाही. अशाही लोकांना नूतन कार्यकारणीत स्थान देण्यात आल्याचा आरोप झाला आहे यामुळे पक्षातील जुन्या व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे मने दुखावली असल्याचे सांगण्यात आले आहे परिणामी शिवसेना कार्यालय अमरावती रोड या ठिकाणी आज पधादिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत सामूहिक राजीनामे दिले घोषणा केली आहे, राजीनामे दिल्यानंतर हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कोणत्या पक्षात जाणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची (Shiv Sena Elgar) दर्यापुरात चांगली ताकद आहे मागील 30 वर्ष या पक्षाने आपला गड कायम राखत आमदारकी मिळवली आहे मागील दोन निवडणुका सोडता या मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वर्चस्व राहिले आहे सद्यस्थितीतही विधानसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार निवडून गेल्याने दर्यापूर मतदार संघ कायम उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले आहे अशा स्थितीत विविध आघाड्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात राजीनामे दिल्याने या पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता दर्यापूर विधानसभा क्षेत्रात निर्माण झाली आहे, यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे मागील आठवड्यात आमदार गजानन लवटे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाची नूतन कार्यकारणी घोषित सुद्धा करण्यात आली आहे यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांचे मने दुखावले असल्याचे बोलले जात आहे.
प्रतिक्रिया पुढील प्रमाणे:
शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार गजानन लवटे हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे कोणतेही लक्ष देत नाहीत यासह नवीन कार्यकारणी निवडताना विश्वासात घेतले नाही आम्ही सर्वांनी हा पक्ष उभा करण्यासाठी खूप मेहनत घेतली असतानाही अशाप्रकारे अपमानित करणे आम्हाला मान्य नाही.
– सतीश काळे, दर्यापूर तालुका समन्वयक, शिवसेना पक्ष
आम्ही निष्ठावान पदाधिकारी असून दर्यापुरात शिवसेना मोठी केली पक्षाच्या आमदाराला निवडून आणण्यात आमचा महत्त्वाचा वाटा आहे तरीही अशी वागणूक मनाला वेदना देऊन जाते यामुळे आम्ही सामूहिक राजीनामे देऊन तटस्थ राहण्याचा विचार केला आहे.
– जमील पटेल, दर्यापूर तालुका सरचिटणीस
ईमाने इतबारे पक्षाचे काम केल्यावरही पक्षाचा आमदार निवडून आणण्यासाठी प्रसंगी घरावरही तुळशीपत्र ठेवणारे आमचे कार्यकर्ते नवनिर्वाचित आमदार यांच्या वर्तणुकीने खिन्न झाले आहेत या पक्षाला मोठे करण्यासाठी व निवडणुकीत आम्ही दिवस रात्र काम केले पक्षाचे सर्व सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दावर आम्ही प्रेम करतो मात्र आम्ही सर्वच पदाधिकारी सामूहिक राजीनामे देत आहोत.
– गणेशराव लाजूरकर, तालुका प्रमुख सहकार, सेल दर्यापूर तालुका
दर्यापूर विधानसभा क्षेत्रात नव्याने निवडून आलेल्या आमदारांचा व त्यांच्या चेलाट चपात्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुणीही विश्वासात घेत नाही अनेक कार्यकर्ते दुरावत चालले आहेत पक्षाकडे या बाबीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही आम्ही राजीनामे देत आहोत.
– सागर वडतकर, उपजिल्हाप्रमुख युवा सेना
नूतन कार्यकारणी घोषित करणे हे माझे काम नाही पक्ष संघटनेतील कार्यकारणी घोषित करताना जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख व पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनातून कार्यकारणी निवडली जाते मी कोणत्याही कार्यकर्त्याला व पदाधिकाऱ्याला पक्षातून काढले नाही व काढणारही नाही मी स्वतः अगोदर शिवसैनिक आहे नंतर आमदार यामुळे कार्यकर्त्यांचा माझ्यावर नाराजीचा कुठलाही संबंध येत नाही.
– गजानन लवटे, आमदार दर्यापूर विधानसभा

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com