Korpana: कोरपना येथे संशयित मृत्यूदेह सापडला.!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

 

कोरपना : शहरात आज दुपारच्या सुमारास एक संशयित मृत्यूदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आज दुपारच्या सुमारास काही नागरिकांनी कोरपना येथील बस स्टॉप मुख्य चौकातील एका पॅक नाली मध्ये एक मृतदेह पडलेला दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. कोरपना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, तो एका अंदाजे 45 ते 50 वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह होता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कोरपना ग्रामीण रुग्णालयात  पाठवीला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी कोरपना पोलीस  अधिक तपास करीत आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013547
error: Content is protected !!