
▪️मोटार वाहतूक कायद्यान्वये होवू शकते कारवाही
प्रतिनिधी श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी :अंजनगाव सुर्जी पोलिसांनी तपासणी उपक्रम हाती घेतला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाही होवू शकते. त्यामुळे वाहन चालकांनी वाहन चालवतांना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन परि.सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से.) यांनी केले आहे.
अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन हद्दीत ठीक-ठिकाणी वाहनांची तपासणी केल्या जाणार असून वाहतूक नियमांचे उल्लघंन केल्यास वाहन चालकांवर कारवाही तसेच पुढील प्रमाणे दंड आकारल्या जावू शकतो. दारू पिऊन वाहन चालविल्यास कलम 185 प्रमाणे गुन्हा दाखल होवू शकतो, विना विमा वाहन चालविल्यास 2000 रुपये दंड आकारल्या जावू शकतो, विना हेल्मेट वाहन चालविल्यास 1000 रुपये दंड आकारल्या जावू शकतो, ट्रिपल सीट वाहन चालविल्यास 1000 रुपये दंड आकारले जावू शकतो, धोकादायक वाहन चालविल्यास 500 रुपये दंड आकारल्या जावू शकतो, वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास 1000 रुपये दंड आकारला जावू शकतो, विना सीट बेल्ट वाहन चालविल्यास 1000 रुपये दंड आकारला जावू शकतो, अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास 5000 रुपये दंड आकारला जावू शकतो, नो-पार्किंग मध्ये गाडी आढळल्यास 500 रुपये दंड आकारला जावू शकतो, वाहनाची पी.यु.सी. नसल्यास 500 रुपये दंड आकारला जाऊ शकतो, तसेच मोटार वाहतूक कायद्यान्वये कठोर कारवाहीस सुद्धा सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन परि.सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से.) यांनी केले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





