
प्रतिनिधी श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी : छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. महाराजांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं तसेच कुशल शासक म्हणून त्यांचे नाव साता-समुद्रापार घेतले जाते. आपण महाराजांचे विचार नक्की घेत आहोत का? आपण त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचवत आहोत का? याचा विचार आपण करायला हवा. शिवरायांच्या विचारांना जिवंत ठेवले तर प्रत्येक दिवस स्वराज्याचा विजय असेल. त्यांची यशोगाथा, त्यांचे विचार आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत.
महाराजांचे असे पाच विचार आपल्या सोबत शेअर करणार आहोत.जे तुम्हाला यश-अपयशात फायद्याचे ठरतील.
???? *कामाचा निश्चय*
जेव्हा तुम्ही एखादे काम करण्यासाठी उत्साही असता तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढीगाऱ्यासारखा दिसतो.
???? *शिक्षणाचे महत्व*
प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे कारण युद्धादरम्यान ज्या गोष्टी ताकदीने साध्य करता येत नाहीत त्या ज्ञान आणि युक्तीने साध्य करता येतात आणि ज्ञान हे शिक्षणातून येते.
???? *शत्रूचा विचार*
शत्रूला कमकुवत समजू नका. परंतु त्याच्या ताकदीचा अतिरेकही करू नका.
???? *परिणामांचा विचार*
कोणतेही काम करण्यापूर्वी त्यांच्या परिणामांचा विचार करणे गरजेचे आहे.कारण आपली भावी पिढी त्याचेच अनुसरण करते.
???? *धेय्याच्या दिशेने पाऊल*
प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेने टाकलेले एक छोटे पाऊल मोठे ध्येय साध्य ठरण्यासाठी महत्वाचे ठरते.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला हे पाच विचार मोलाचे ठरणार असून जे तुम्हाला डॉल्बी आणि धांगड-धिंग्यात मिळणार नाही.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





