औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

*विहिंप व बजरंग दलचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

प्रतिनिधी श्रीकांत नाथे अंजनगाव सुर्जी :-उझबेगी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर संभाजी महाराज नगर या शहरात आहे. वास्तविक, औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते संभाजीनगर येथे पुरले व त्याठिकाणी त्याची कबर करण्यात आली ती कबर काढून टाकण्यात यावी. यासाठी येथील विहिंप व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी येथील तहसिलदार पुष्पा सोळंके यांच्या मार्फत सोमवारी दि.१७ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

औरंगजेबाने शिख गुरु तेगबहादूर यांची क्रूरपणे हत्या केली. शिख गुरु गोविंदसिंह यांच्या दोन बालसाहेबजा‌द्यांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणी चिरडून मारण्यात आले. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची सुद्धा क्रूरपणे हत्या केली की, त्याचे वर्णन करता येणार नाही. अशी भयंकर यातनामय हत्या याने केली. श्री. काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले, मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा यानेच विध्वंस केला. सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले त्र्यंबकेश्वर मंदिर, जेजुरी गड यावर हल्ले सुद्धा यानेच केले. हजारो हिंदुंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूर कत्तल केली. छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हिंदूचे मोठ्या प्रमाणावर धर्मातरण केले.
अश्या क्रूरकर्मा औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर असणे हि पुर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच, अनंत यातनांचे प्रतिक आहे. आम्ही सर्व आपणांस विनंती करतो की, आपण हि कबर पुर्णपणे नष्ट करावी, परकीयांचे कुठलेही नामोनिशाण हे नष्ट झाले पाहिजे. तरी आपण योग्य पद्धतीने हि कबर पुर्णपणे काढून टाकावी. व हे न झाल्यास पूर्व सुचित करून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हिंदू समाजा बरोबर संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंग्याची कबर ध्वस्त करतील अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी पवन वैरागडे,मनीष मेन,संदीप राठी, राहुल पंड,पवन चऱ्हाटे ,मयूर देशमुख,जीवन चऱ्हाटे ,अंकुश होटे,तेजस काळमेघ,शुभम गौर,तुषार धारस्कर, सुभाष धुळे, प्रणय गायगोले,विवेक झाडे,रवी दवे,दीप नाथ, सचिन चौखंडे,बाबाराव चौखंडे,तन्मय बेलोकार,मनीष कुशवाहा,सार्थक गायगोले, दर्शन कहार,अर्पित घोगरे,सौरभ जुनगरे,राम इंगळे, अंकुश गायगोले यांची उपस्थिती होती.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013546
error: Content is protected !!