
• अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात; डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप
अचलपूर (श.प्र.). उपजिल्हा अचलपूर रुग्णालयात महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत पोलिस अधीक्षक व आरोग्य प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.
चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील सुमैया बानो पती अब्दुल कलाम (32) हिला प्रसूतीसाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे तिने मुलाला जन्म दिला. मृताचा भाऊ मोहम्मद इरफान मोहम्मद उस्मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला त्यामुळे महिलेच्या पोटात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे तिची प्रकृती ढासळू लागली. प्रकृती गंभीर झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला अमरावतीच्या इर्विन हॉस्पिटलमध्ये रेफर केले. कुटुंबीयांनी महिलेला अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल केले,तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना प्रकृती गंभीर असल्याने पुन्हा शस्त्रक्रिया केली. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे सुमैयाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताच्या भावाने अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकारी व अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी प्रशासन तात्काळ कारवाई करून दोषी डॉक्टरवर कठोर कारवाई करेल, अशी अपेक्षा मृतांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
डॉक्टर, परिचारिकांची कमतरता तत्कालीन आमदार व राज्यमंत्री वसुधा देशमुख यांच्या प्रयत्नातून जागतिक बँकेने 30 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम झाले. गेल्या 20-22 वर्षांपासून हे शासकीय रुग्णालय शोभेची वास्तू बनली आहे. या रुग्णालयाची व्यवस्था नेहमीच विस्कळीत असते, रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असते. बहुतांश रुग्णांना अमरावती येथे रेफर केले जाते. या रुग्णालयातील निष्काळजीपणाची ही काही वेगळी घटना नाही.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






