Parbhani : पोलिस दलातील १७ सपोउपनि बनले पोलिस उपनिरीक्षक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

परभणी  :- पोलिस दलाच्या आस्थापनेवर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक  म्हणुन कार्यरत असलेल्या १७ पोलिस अंमलदारांना श्रेणी पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. निकष पूर्ण करणार्‍या अंमलदारांना पदोन्नती मिळाली आहे. याबाबत पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी यांनी २७ मार्च रोजी आदेश काढले आहेत.

पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी यांनी काढले आदेश

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हे पोलिस दलामध्ये किमान ३० वर्ष सेवा पूर्ण असलेले, सपोउपनि या पदावर तीन वर्ष सेवा पूर्ण असलेले आणि आश्वासीत प्रगती योजनेनुसार पोउपनि संवर्ग पदाची वेतनश्रेणी घेत असलेले असा निकष पूर्ण करणारे सपोउपनि संवर्गातील पोलिस अंमलदारांना श्रेणी पोउपनि म्हणुन संबोधण्यात येते. जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १७ जणांना श्रेणी पोउपनि पदोन्नती मिळाली आहे.

यामध्ये कोतवाली पोलिस ठाण्यातील सपोउपनि बाळू काळे, पोलिस मुख्यालयातील सपोउपनि हनुमंत कच्छवे, साहेबराव राठोड, पोलिस नियंत्रण कक्षातील कैलास सुर्यवंशी, पिंपळदरी पोलिस ठाण्यातील वैजनाथ शिनगारे, चारठाणा येथील माणिक कुलकर्णी, गंगाखेड येथील मिर्झा समशाद बेग, शेख म. फिरोज अताऊर रहेमान, चंद्रशेखर बावीसकर, शेख शकील शेख सलीम, जिल्हा विशेष शाखेतील जरार अहेमद जुल्फेखार, शहर वाहतुक शाखेतील पांडूरंग बचाटे, ताडकळस येथील गुलाब घुगे, एसआयडीचे सय्यद अनवर, वाचक शाखेतील नरेश शिरसकर, पूर्णा येथील अब्दुल अमर अब्दुल हबीब चाऊस आणि दैठणा येथील बळीराम मुंढे यांना श्रेणी पोउपनि पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013545
error: Content is protected !!