Parbhani : श्रीक्षेत्र त्रिधारा येथे अमावस्या निमित्त एक लाख भाविकांनी घेतले दर्शन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

परभणी :- परभणी तालुक्यातील श्री क्षेत्र त्रिधारा येथे वार शनिवार 29‌ मार्च रोजी अमावस्या निमीत्त भाविकांनी या ठिकाणी असलेल्या गंगेत पवित्र स्नान करून दर्शन घेत सकाळ पासून सायंकाळ पर्यंत जवळपास एक लाख भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी हभप बापुराव महाराज गणपुरकर यांचे भव्य किर्तन झाले यावेळी भाविक भक्त  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह.भ.प बापुराव महाराज गणपुरकर यांचे किर्तन संपन्न

परभणी तालुक्यातील क्षी क्षेत्र त्रिधारा देवस्थान हे जागृत देवस्थान व भाविकांचे क्षद्धाथान म्हणून ओळखले जाते.परभणी जिल्ह्यासह हिंगोली,नांदेड लातूर व ईतर भागातील भाविकांची दर अमावस्याला दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. क्षी क्षेत्र त्रिधारा या ठिकाणी असलेल्या त्रिसंगम गंगेत स्थान केल्याने अनेक दुख नाहीसे होतात अशी अनेक भाविकांची भावना आहे. क्षी क्षेत्र त्रिधारा या ठिकाणी ओंकारनाथ महाराजांचे मंदिर आहे.या ठिकाणी असलेले ओंकारनाथ महाराजांचे जागृत देवस्थान असल्याने येथील दर्शनासाठी परभणी जिल्ह्यासह अनेक भागातून भाविक हे मोठ्या प्रमाणावर येतात. वार शनिवार 29 मार्च रोजी शनिवारी रोजी अमावास्या आल्याने सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती.

सकाळपासून सायंकाळपर्यंत जवळपास एक लाख भाविकांनी या ठिकाणी असलेल्या गंगेत पवित्र स्नान करून क्षाी क्षेत्र त्रिधारा या ठिकाणी असलेल्या शनी मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर,दत्तात्रेय मंदिर,पांडुरंग मंदीरासह येथील असलेल्या ओंकारनाथ महाराजांचे दर्शन घेऊन या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सकाळी नाश्त्याची व दुधाची व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प बापुराव महाराज गणपुरकर यांचे कीर्तन संपन्न झाले यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांची सायंकाळ पर्यंत दर्शनासाठी रेलचेल दिसून आली

FacebookWhatsappInstagramTelegram
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013546
error: Content is protected !!