Parbhani : रायगड नगरातील उद्यान अतिक्रमणाच्या विळख्यात…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

परभणी :- शहरातील रायगड नगर महादेव मंदिर परिसरात नवीन उद्यानाचे काम करण्यात येत आहे. उद्यान परिसरात काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. तर काहींनी आपल्या घरातुन दरवाजे उद्यानाकडे सोडले आहेत. उद्यानाचे काम चांगल्या दर्जाचे करावे, उद्यान अतिक्रमण मुक्त करावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदनाव्दारे महापालिका  आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

उद्यानाचे काम चांगल्या दर्जाचे करावे महापालिका आयुक्तांना निवेदन

रायगड नगर वासीयांनी याबाबत निवेदन सादर केले आहे. परिसरात सुरु असलेल्या उद्यानाचे काम योग्य प्रकारे करावे, उद्यान परिसरात झालेले अतिक्रमण काढुन टाकावे, या भागात काही नागरिकांनी उद्यानाच्या बाजुने दरवाजे सोडले आहेत. सदरचे दरवाजे बंद करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर विशाल तनपुरे, विश्वजीत देशमुख, गजानन शिनगारे, गणेश तनपुरे, शुभम भिसे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013546
error: Content is protected !!