Washim : गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड; इतक्या हजारांचा मुद्देमाल जप्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मानोरा  :- तालुक्यातील पोहरादेवी येथे रामनवमी यात्रेनिमित्त बिट हद्दीत दि. २८ मार्चला पोलिसांचा ताफा पेट्रोलींग  करीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून उमरी येथील अंबादास रामसिंग राठोड यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता गावठी हात भट्टी दारूवर धाड टाकून ४०,००० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.

हात भट्टी दारूवर धाड टाकून ४०,००० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी उमरी येथील अंबादास राठोड यांच्या घराची झडती घेतली घरामध्ये १५० लिटर हात भट्टीची दारूने भरलेली काळया रंगाची टाकी किंमत १५,००० हजार रुपये व २०० लीटर सडवा मोहमाच २०,००० हजार रुपये व दारू गाळण्याचे साहित्य किंमत ५,००० असा एकूण ४०,००० रुपयाचा दारूसह मुद्देमाल जप्त केला. अवैद्यरित्या गावठी दारू सह मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचा समक्ष पोलिसांनी जप्त करून वरील आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप अल्लापुरकर, डी बी पथक पोलीस उपनिरिक्षक अभिजीत बारे, सफो रवी राजगुरे, पोहवा मदन पुणेवार, पोलीस शिपाई मनीष अगलदरे, रोहन तायडे, चालक पोलीस शिपाई श्रावण राठोड, महीला होमगार्ड नैना व नम्रता यांनी केली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013546
error: Content is protected !!