Parbhani : ऑटो रिक्षा- बोलेरो गाडीच्या अपघातात एकाचे निधन, एकजण गंभीर जखमी…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

परभणी जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच…!

परभणी :- सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव- मानवत रोड दरम्यान बजाज ऑटो रिक्षा- बोलेरो गाडी या वाहनात झालेल्या अपघातात एका ३२ वर्षीय तरुणाचे निधन झाले तर दुसरा ३२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवार ३० मार्च रोजी रात्री साडेनऊ च्या सुमारास घडली आहे. याबाबतची माहिती याप्रमाणे शहरातील सरस्वती कॉलनी येथील आकाश अरुण आढाव वय ३२ वर्षे आपला सहकारी गजानन गणेश पडूळे वय ३२ वर्षे याच्या सोबत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर परभणी येथील बजाज ऑटो शोरूम वरून ऑटोरिक्षा खरेदी करून परभणीहून गावाकडे सेलू येथे येत असताना त्यांच्या आटोला एका भरधाव बोलोरो गाडीने ढेंगळे पिंपळगाव -मानवत रोड दरम्यान दिलेल्या धडकेत आकाश आढाव याचे जागीच निधन झाले.

दररोज जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात होत आहे अपघात

गजानन पडुळे वय ३२ वर्षे राहणार शिवाजीनगर सेलू हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारार्थ सेलु उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर पुढील उपचारार्थ रेफर करण्यात आले. ही घटना गुढीपाडवा सणाच्या दिवशी रात्री घडल्याने या रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. तसेच अपघातानंतर कोणीही मदतीला तात्काळ धावून गेले नाही. घटनेची माहिती मानवत पोलीसांना कळतात पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमीस सेलू उपजिल्हा रुग्णालयात तर मयत यास शवविच्छेदनासाठी कोल्हा येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जोगदंड यांनी सोमवार ३१ मार्च रोजी दुपार अकरा वाजता शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले. मयत आकाश आढाव याच्या पार्थिवावर ३१ मार्च रोजी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार  करण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत मानवत पोलीस ठाण्यात तक्रारच नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही. आकाश आढाव याच्या पश्चात आजोबा ,पत्नी , दोन लहान मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे सरस्वती नगर सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013545
error: Content is protected !!