शोकाकुल परिजनांसाठी घरपोच पन्नास जणांची टिफिन
बुलडाणा : घरात एखादी दुःखद घटना घडल्यावर त्या घरात चूल पेटत नाही, अशावेळी शेजारचे म्हणून त्या घरी जेवण घेऊन जातात.. याच संकल्पनेतून बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने बुलढाणा शहरातील अशा शोकाकुल परिजनांसाठी 50 जणांची टिफिन घरपोच देण्याची व्यवस्था काही वर्षापासून सुरू केली आहे. मात्र ही व्यवस्था अनेकांना माहित नसल्याने त्यासाठी बुलढाणा अर्बनचे सर्विस सर्व राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी फोन नंबरसह एक पत्र जारी करून या व्यवस्थेसाठी संपर्क करण्याचे आवाहन ज्याघरी दुःखद घटना घडतात त्या परिवारांना केले आहे.
बुलढाणा अर्बनच्या सोशल सर्विसेसच्या माध्यमातुन दु:खद घटना घडलेल्या परिवारातील परिजनांसाठी 50 लोकांचा टिफीन मोफत घरपोच दिला जातो. परंतु गेल्या वर्षभरात शहरात बर्याच परिवारात दु:खद घटना (मृत्यु) घडल्या. परंतु कदाचित संस्थेच्या या योजनेच्या माहीती अभावी आप्तस्वकीयांनी या योजनेचा उपयोग करुन घेतला नाही. गेल्या वर्षभरात फक्त 55 परिवारांनी या योजनेचा उपयोग करून घेतला आहे. तरी संस्थेच्या या योजनेची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी राधेश्याम चांडक यांनी बुलडाणा अर्बन परिवारच्या वतीने खालील ठिकाणी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे
त्यासाठीचा संपर्कपत्ता “बुलडाणा अर्बन सोशल सर्विसेस, समृद्धी अपार्टमेंट, जेल रोड, अन्नपूर्णा मंगल कार्यालया मागे, बुलडाणा हा असून संपर्कासाठी 9423144737, 8888333964 या क्रमांकावर आवाहन संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी आवाहन त्यांनी केले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





