Latur: लातूरलाच आयुक्तालय हवे..! शासनाकडे भूमिका मांडा..!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लातूर :- कार्यालय स्थापन करताना लातूर येथेच विभागीय आयुक्त कार्यालय  झाले पाहिजे आणि यासाठी लातूर जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदारांनी महाराष्ट्र शासनाकडे  आग्रही भूमिका मांडावी, अशी मागणी लातूर विभागीय महसूल आयुक्तालय निर्माण कृती समितीच्यावतीने करण्यात आली.

लातूर जिल्ह्यातील मंत्री व आमदारांना कृती समितीचे साकडे

राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन लातूरकरांची आयुक्तालयाची मागणी ही केवळ भावनिक नसून गुणवत्तेवर आधारलेली आहे. तसेच ही मागणी मराठवाड्याच्या समतोल विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. आज घडीला लातूर येथे तब्बल ३६ विभागीय कार्यालये कार्यरत आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे जिल्हे सोडल्यास परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड हे सहा जिल्हे विविध विभागीय कार्यालयाने लातूरशी जोडले आहे. विभागीय आयुक्तालयासाठी आवश्यक असणारी इमारत गेली १५ वर्षांपासून तयार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला लातूर येथे दुसरे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करणे सहज शक्य आहे. म्हणून मंत्री पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे लातूर येथेच महसुल आयुक्तालय स्थापन करण्यासाठी आग्रहाची भूमिका मांडावी, अशी मागणी कृती समितीने केली.

माजी मंत्री तथा आ. संजय बनसोडे आणि आ. रमेश कराड यांचीही भेट कृती समितीने घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून आयुक्तालयासाठी शासनाकडे भूमिका मांडावी, असा आग्रह धरला. लातूर जिल्ह्यातील सर्व आमदारांना महसूल आयुक्तालय निर्माण कृती समितीच्यावतीने भेटून या प्रश्नावर शासन दरबारी तसेच विधानसभेत भुमिका मांडण्यासाठी आग्रह करण्यात येणार आहे. या शिष्टमंडळात प्रामुख्याने माजी आ. वैजनाथ शिंदे, अॅड. व्यंकट बेद्रे, अॅड. बळवंत जाधव, अॅड, अण्णाराव पाटील, भाई उदय गवारे, मोईज शेख, कॉ. संजय मोरे, अॅड. प्रदीप गंगणे, अॅड. व्यंकट नाईकवाडे, धनराज साठे आदींचा समावेश होता.

FacebookWhatsappInstagramTelegram
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013546
error: Content is protected !!