Parbhani : सेलू येथील नामांकित महाविद्यालयाची १९ वर्षीय विद्यार्थिनी गायब…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सेलू/परभणी :- शहरातील परभणी रस्त्यावर असलेल्या एका नामांकित महाविद्यालयाची १९ वर्षीय विद्यार्थिनी १ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घरून या महाविद्यालयात प्रॅक्टिकल  देण्यासाठी गेली ते परत न आल्यामुळे घरच्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर बुधवार २ एप्रिल रोजी रात्री ००:३३ वाजता मिसिंग दाखल केली आहे. यापूर्वी याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी बारावीची परीक्षा देण्यासाठी गेली असता अशीच गायब झाली होती. आजची ही दुसरी घटना आहे. यामुळे महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या महाविद्यालयातील विद्यार्थिनी बेपत्ता होण्याची दुसरी घटना !

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील परभणी रस्त्यावर असलेले एका नामांकित महाविद्यालयात बी.एस्सी प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षी विद्यार्थिनीने या महाविद्यालयात प्रॅक्टिकल करण्यासाठी जाते असे १ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता सांगून निघून गेली ती परत आलीच नाही. घरच्यांनी महाविद्यालयासह सर्वत्र शोध घेतल्यानंतर आढळून न आल्यामुळे अखेर बुधवार २ एप्रिल रोजी रात्री बारानंतर ००:३३ वाजता मिसिंग दाखल केली आहे. नुकत्याच संपलेल्या इयत्ता बारावीचा पेपर देण्यासाठी याच महाविद्यालयातील १८ वर्षीय विद्यार्थिनी गायब झाली होती. आजची विद्यार्थिनी बेपता होण्याची दुसरी घटना आहे. महाविद्यालय परिसरात सह शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे. ३९ वर्षीय मुलीच्या नातेवाईक यांनी दिलेल्या खबरे वरून मिसिंग दाखल करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के. आर. मुलगीर पुढील तपास करत आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013546
error: Content is protected !!