Shegaon accident : शेगाव मार्गावर भीषण अपघात; सहा जण ठार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शेगाव :- शेगाव – खामगाव रोड वरील जयपूर लांडे फाट्या नजीक २ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास भरधाव बोलेरो कार व एसटी बसचा अपघात झाला. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. झालेल्या तिहेरी भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर २४ जण जखमी आहेत.

तिहेरी भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू

घटनेची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण व खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात   उपचार सुरू आहे हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी एक एसटी महामंडळाची शयनयान बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती. अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले मृत्यू झाला आहे. त्यातील ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजार असून पुढील कारवाई केली जात आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013546
error: Content is protected !!