लातूर : स्वतः डोक्यात मारून घेवून जखमी झालेले लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना आज एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलविण्यात आले. शनिवार रात्रीपासून त्यांच्यावर डॉ. हनुमंत किनीकर यांच्या सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात बेत होते. मनोहरे यांना एअर ॲम्ब्युलन्सने हलवण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटल ते लातूर विमानतळ असा ग्रीन कॅरीडोर निर्माण करण्यात आला होता.
लातूर शहर महानगरपालिकेच आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी परवा शनिवारी रात्री लातूर शहरातील महापालिकेच्या मालकीच्या शासकीय निवासस्थानी स्वतः डोक्यात गोळी मारून घेतली होती. हा प्रकार घडताच तातडीने त्यांना लातूरच्या सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रूग्णालयाचे डॉक्टर हनुमंत किनीकर हे त्यावेळी बाहेरगावी असतानाही तातडीने ते लातूरला आले. अत्यंत क्रिटीकल अशा परिस्थितीत असलेल्या जखमी बाबासाहेब मनोहरे यांच्यावर डॉ. किनीकर यांनी अनेक किचकट शस्त्रक्रिया केल्या. गोळी डोक्यातून आरपार गेल्याने मनोहरे यांची प्रकृती गंभीर बनली आहे.
डॉ. किनीकर यांच्या मतानुसार मनोहरे हे उपचाराला प्रतिसाद देत आहेत. तरीही पुढील उपचारासाठी म्हणून त्यांना मुंबईला नेणे आवश्यक असल्याने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर व प्रशासनाचा सल्ला घेतल्यानंतर आज दुपारी गंभीर अवस्थेत जखमी असलेले मनोहरे यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला नेण्यात आले. मुंबई येथे कोकीलाबेन रूग्णालयात त्यांच्यावर डॉ. अभयकुमार यांच्या नियंत्रणात उपचार करण्यात येणार आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





