7 दिवस चाललेल्या या क्रूरतेच्या घटनेने परिसर हादरले
वाराणसी : वाराणसीमधून एक अतिशय लज्जास्पद घटना समोर आली आहे. जिथे एका 19 वर्षीय मुलीवर 23 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना 29 मार्च रोजी घडली. 7 दिवस चाललेल्या या क्रूरतेच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
माहितीनुसार, तरुणी 4 एप्रिल रोजी घरी परतली आणि तिने तिच्या कुटुंबाला तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला, त्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. 29 मार्च रोजी संध्याकाळी पांडेपूर लालपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका वस्तीत राहणारी एक तरुणी अचानक बेपत्ता झाली. जेव्हा तिने परत येऊन तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.
23 तरुणांनी केला एका मुलीवर सामूहिक बलात्कार
तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे कथन करताना, तरुणीने आरोप केला की, ती घरातून बेपत्ता झाल्यानंतर सात दिवसांत, 23 जणांनी तिला ओलीस ठेवले आणि तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी 29 मार्च रोजी एका मैत्रिणीच्या घरी गेली होती आणि परतताना तिची राज विश्वकर्मा नावाच्या एका व्यक्तीशी भेट झाली. तो तिला एका कॅफेमध्ये घेऊन गेला आणि रात्रभर तिच्यावर बलात्कार केला.
तरुणीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, दुसऱ्या दिवशी तिला समीर आणि त्याचे मित्र रस्त्यात भेटले. ज्यांनी पुन्हा महामार्गाजवळ तिच्यावर बलात्कार केला आणि तिला नाडेसर येथे सोडले. 31 मार्च रोजी तिला सोहेल, अनमोल, दानिश, साजिद आणि झहीर भेटले. ज्यांनी तिला कॅफेमध्ये ड्रग्ज पाजले आणि तिच्यावर बलात्कार केला. 3 एप्रिल रोजी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली, जिथे नशेमुळे ती झोपी गेली. संध्याकाळी, तिची भेट दानिशशी झाली, जो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि त्याचे मित्र सोहेल, शोएब आणि दुसऱ्या एका पुरूषासह तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी 6 जणांना केलेअटक
4 एप्रिल रोजी जेव्हा ती परत आली आणि तिने ही घटना सांगितली. तेव्हा पीडितेची कहाणी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणात, पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डीसीपींनी सांगितले. या प्रकरणात राज विश्वकर्मा, राज खान, सोहेल, दानिश, अनमोल, समीर, आयुष, इम्रान, जैब, अमन, झहीर, साजिद आणि 11 अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की. पुढील तपास सुरू आहे आणि कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





