निवडणुकीपूर्वी आश्वासन देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाचा संताप
स्थानिक पंचवटी चौकात चक्काजाम आंदोलन
अमरावती : महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे सांगितले परंतु निवडणूक होताच सत्तेत आल्यानंतर सरकारने शब्द फिरवला व उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात शेतकऱ्यांनी कर्ज भरावे. या सरकारच्या विरोधात शेतकरी व शिवसैनिक यांनी सहभागी होऊन चक्का जाम करत मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळून प्रचंड आक्रोश व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाळला पुतळा
यावेळी जिल्हाप्रमुख पराग गुडधे, मनोज कडू, नरेंद्र पडोळे, प्रदीप बाजड उपजिल्हाप्रमुख राजेश बंड, प्रफुल भोजने, याहया खान पठाण, डॉ नरेंद्र निर्मळ, विलास माहुरे,तालुका प्रमुख नितीन हटवार, कपिल देशमुख, रामदास बैलमारे, प्रमोद कोहळे, दिलीप केणे, कुमार आंडे, नरेंद्र देऊळकर, गजानन यादव, संजय चौधरी, सुरेश जूनघरे, निलेश मुंदाने, शंकर वाटाणे उपतालुका प्रमुख, आश्विन नागे तालुका प्रमुख अचलपूर सहभागी झाले.
शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन
तसेच शैलेश पांडे तालुका प्रमुख चांदूरबाजार, समाधान गाडगे, मुरली पडोळे, अक्षय पावडे, सुरेश काकडे, शाम शेंडे, ऋषिकेश सगणे, युवासेना तालुका प्रमुख विनोद काळे, संजय पिंगळे, दिलीप काळे, प्रदीप गौरखेडे, उपमहनगर सुनिल राऊत, विजय ठाकरे, पंजाबराव तायवाडे, नितीन तारेकर, दिलीप काकडे, विनोद मंडळकर, शरद वानखडे, सचिन ठाकरे, वैभव सवाई, अविनाश वानखेडे, मनोज मोरे, दिलीप चौधरी, अविनाश तायडे, वैभव मोहोकार, शिवराज चौधरी, तुकाराम चौहान, यांच्यासह असंख्य शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







