हळद घेऊन आलेल्या वाहनांची लांबच लांब रांग
वसमत : वसमत बाजारपेठेत पाडव्याच्या मुहूर्ता पासून नवीन हळदी येणे सुरू झाले आहे सोमवारी वसमत मार्केट यार्ड मध्ये हळद घेऊन प्रचंड संख्येने वाहन आले होते हळद घेऊन आलेल्या वाहनांची लांबच लांब रांग सोमवारी पहावयास मिळाली सोमवारी किमान दहा हजार पेक्षा जास्त कट्ट्यांची आवक झाली असल्याचे चित्र आहे. प्रचंड प्रमाणात आल्याने दिवसभर हळदीचे बिट झाले त्यात 14000 ते 16000 पर्यंत हळदीला दर मिळाला हळदीला चांगला दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
वसमत मोंढयात पाडव्यापासून हळदीची आवक वाढली आहे बीटामध्ये दररोज चारहजार ते पाच हजार कट्टे हळद येत आहे पाडव्याच्या मुहूर्तावर तर दहा हजारापेक्षा जास्त कट्टे आवक झाली होती वसमत मोढयात हळदीच्या बीटात चांगला दर मिळत असल्याने बाहेरच्या जिल्ह्यातूनही हळद वसमतमध्ये येत आहे. सोमवारी हळद घेऊन मोठ्या संख्येने वाहन वसमतमध्ये दाखल झाले होते हळद घेऊन येणाऱ्या वाहनांची गर्दी एवढी मोठी होती की मार्केट यार्ड पासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत हळदीच्या वाहनाच्या रांग लागली होती एवढ्या मोठ्या प्रमाणात राग लागल्याचे पहिल्यांदाच पहावयास मिळाले यावर्षी वसमत परिसरात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे बाहेर जिल्ह्यातूनही वसमत मध्ये हळद विक्रीसाठी येत असल्याचे चित्र आहे पाडव्याच्या मुहूर्तावर 18 हजार रुपयापर्यंत हळदीचा दर गेला होता तेव्हापासून सरासरी दरही चांगला मिळत आहे.
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये हळदीला सर्वाधिक दर मिळत असल्याने सध्या हळदीच्या दरात तेजी असल्याने बाहेर जिल्ह्यातूनही हळद उत्पादक हळद घेऊन वसमत मार्केट यार्ड मध्ये येत आहेत. वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे देशभरातील हळदीचे व्यापारी हळद खरेदीसाठी वसमत मध्ये येत असतात त्यामुळे चांगल्या प्रतीच्या हळदीला चांगला दर मिळतो त्यामुळेही वसमतमध्ये हळदीची आवक वाढत आहे. मागच्या वर्षी हळदीला 20 हजारापर्यंत हळद विकल्या गेलीयावर्षीही हळदीला चांगला दर राहील, अशी अपेक्षा आहे नव्या हळदीला सर्वाधिक18000 रुपयांपर्यंत दर मिळालायावर्षी हळदीच्या दरात तेजी राहील असे व्यापारी वर्गातून समजते.
बाजार समितीचे सभापती तानाजीपाटील बेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वसमत बाजार समितीमध्ये हळदीला सर्वाधिक दर मिळतो म्हणून वसमतची बाजार समिती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे परिसरातील शेतकरी वसमत बाजार समितीमध्ये हळद आणतातच तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने शेतकरी वसमत मध्ये हळद विक्रीसाठी आणत असतात वसमत बाजार समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी प्रयत्न होत असतात बाहेर राज्यातील प्रमुख खरेदीदार व्यापाऱ्यांना वसमत मध्ये आमंत्रित केले जाते खरेदीदार व्यापारी मोठ्या संख्येने आल्याने शेतीमालाला चांगला दर मिळतो हळद उत्पादक शेतकऱ्यांनी वसमतच्या बाजार समितीमध्येच हळद आणावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती तानाजी पाटील बेंडे यांनी केले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





