जिल्ह्यातील ७९ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

वृद्धापकाळातील परवड थांबणार : गरीब,कष्टकऱ्यांना दिलासा

 

धामणगाव रेल्वे: नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची घोषणा कामगार कल्याण मंत्रालयाच्या वतीने अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे असले तरी शासनाने अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. या योजनेमुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान सुखकर होईल.

बांधकाम कामगारांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे होऊ शकत नाही. तसेच, त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही. वृद्धापकाळात बांधकाम कामगारांची परवड होऊ नये, यासाठी त्यांना निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील कामगारांना सदर निर्णयाची अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. याकडे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यात दरवर्षी कामगारांची नोंदणी वाढत असल्याचे चित्र आहे.

नोंदणी कशी करणार? इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाइटला भेट देऊन तेथे आवश्यक माहिती भरावी, तसेच कागदपत्रे अपलोड करून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करता येते. सेतू केंद्रात जाऊन नोंदणी करावी.

केव्हा, किती मिळणार निवृत्ती वेतनचा लाभ ? बांधकाम कामगारांना ६० वर्षे वयानंतर निवृत्तीवेतन मिळणार आहे. कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतलेला आहे. मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये निवृत्तिवेतन दिले जाणार आहे

कामगारांना अन्य लाभ काय ? कामगारांना सुरक्षा पेटी संच तसेच किचन संच तसेच विविध योजनांचा लाभ दिला जातो. या लाभांमध्ये घरकुल, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अपघात विम्याचा लाभ व अन्य योजनांचा समावेश आहे.

कालावधीनुसार मिळणार निवृत्तीवेतनाचा लाभ कामगारांना १० वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ५० टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी ६ हजार, १५ वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर ७५ टक्के मर्यादेत प्रतिवर्षी ९ हजार निवृत्तीवेतन दिले जाईल. २० वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी १२ हजार रुपये एवढे निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे.

नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन इमारत बांधकाम कामगार मंडळाकडे नोंद असलेल्या कामगारांनाच या योजनेचा लाभमिळणार आहे. यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असावा.

७९ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी जिल्हाभरातून झाली आहे. या योजनेतील दरवर्षी नोंदणी संख्या वाढत आहे. सुरक्षा किट, किचन संच व विविध योजनांचा लाभमिळत असल्याने अनेक जण नोंदणी करतात. त्याचा लाभत्यांना मिळत आहे.जिल्ह्यात ७७ हजारांवर सक्रीय कामगार आहेत.

 

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013545
error: Content is protected !!