परतवाडा : बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आईने गर्भधारणेपूर्वी आणि गरोदरपणात आवश्यक तपासण्या करणे गरजेचे आहे. विशेषतः आईचे वय ३५ पेक्षा जास्त आणि वडिलांचे ४५ वर्षापेक्षा जास्त असल्यास अधिक काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
बाळ होऊ देण्याचे योग्य वय आईचे वय ३५ च्या आत : गर्भधारणा होणे आरोग्यासाठी सुरक्षित मानले जाते. यामुळे बाळात जन्मजात दोष येण्याची शक्यता कमी होते.
वडिलांचे वय ४५ च्या आत : संततीसाठी अनुकूल मानले जाते. अधिक वय असल्यास शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
बाळाला गंभीर आजार तर नाही ना? आवश्यक तपासण्या रक्त तपासणीः यॅलेसेमिया,
हिमोग्लोबिन असामान्यता आणि संक्रमणजन्य आजारांचे निदान.
अल्ट्रासोनोग्राफी : बाळाच्या वाढीचा आढावा घेण्यासाठी व जन्मजात दोष ओळखण्यासाठी.
जेनेटिक तपासणी: जन्मजात विकार,डाऊन सिंड्रोम आणि इतर आनुवांशिक आजार टाळण्यासाठी आवश्यक.
३५-४५ नंतर बाळ होत असेल तर काय काळजी घ्याल?
नियमित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करून घ्या. जीवनशैली सुधारून संतुलित आहार व व्यायामावर भर द्या. मानसिक तणाव टाळण्यासाठी योग व ध्यानाचा अवलंब करा. उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांवर विशेष लक्ष ठेवा.
३५ व्या वर्षांनंतर गर्भावस्थेदरम्यान अलीकडच्या वयापेक्षा अधिक काळजी घेणे आवश्यक असते. वेळेवर योग्य तपासण्या केल्यास आई व बाळ दोघांचे आरोग्य सुरक्षित राहते.
डॉ. मोनाली ढोले, स्त्रीरोगतज्ज्ञ
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





