ग्रामीण वाहतूक पोलिसांची अनपेड चालान वसुली मोहीम जोरातः १३८ वाहनधारकांविरुद्ध खटले
अमरावती : जिल्ह्यामधील वाहनधारकांकडे प्रलंबित असलेल्या ई-चालान दंडाचा भरणा करण्याकरिता अमरावती ग्रामीण पोलिसांकडून १ डिसेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यादरम्यान मागील ई-चालान अनपेड केसमध्ये १ कोटी ७१ लाख ९९ हजार १०० रुपये व नियमित केसमधून ६१ लाख १९ हजार ५०० रुपये, असा एकूण २ कोटी ४४ लाख १८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ती संपूर्ण रक्कम शासनजमा करण्यात आली, तसेच १३८ वाहनधारकांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. दंड न भरल्यास न्यायालयाचे परवानगीने वाहन जप्त करण्याची मोहीमदेखील सुरू करण्यात आली आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून वर्ष २०१९ पासून ई-चालानने दंड आकारण्यात आला. मात्र, लाखो वाहनचालकांनी पोलिसांनी पाठविलेल्या त्या चालानकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे डिसेंबर २०२४ पर्यंत अनपेड चालानची रक्कम तब्बल २५.२३ कोटींवर पोहोचली. ४.२४ लाख वाहनचालकांनी अमरावती ग्रामीण वाहतूक पोलिसांनी पाठविलेल्या ई-चालानची रक्कम भरली नाही. त्यामुळे
पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामीण पोलिस विभागातर्फे अनपेड दंड वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली. त्याअंतर्गत ई-चालान दंड प्रलंबित असलेल्या वाहनधारकांच्या रहिवासी पत्त्यावर डोअर टू डोअर नोटीस बजावून प्रलंबित दंडाचा भरणा करण्याकरिता वाहतूक पोलिस अंमलदारांचे पथक नेमण्यात आले होते.
असा भरा दंड
https://mahatrafficechallan.gov. in या संकेतस्थळावर कोणत्याही वाहतूक अंमलदाराकडे असलेल्या ई-चालान मशीनद्वारे भरता येणार आहे. आपण ज्या ठिकाणी राहता, त्या ठिकाणच्या कोणत्याही ट्रॅफिक अंमलदारांकडे ई-चालान मशीनद्वारेच ही दंड रक्कम स्वीकारली जाते.
मोहिमेला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ याविशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यामधील ३१ पोलिस ठाण्यांतर्गत प्रलंबित ई-चालान दंडाचा भरणा करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या वाहतूक पोलिस पथकांनी वाहनधारकांना नोटीस बजावून प्रलंबित ई-चालान दंडाचा भरणा करवून घेण्यात आला. तसेच या कालावधीत नियमित केस करताना जास्तीत जास्त पेड केस करून मागील अनपेड केसचा भरणा करून घेण्यात आला. ही विशेष मोहीम ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
ज्या वाहनधारकांनी प्रलंबित दंडाचा भरणा केला नाही, अशा वाहनधारकांविरुद्ध न्यायालयात खटले पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयामार्फत समन्स निघाल्यानंतर दंडाचा भरणा न केल्यास न्यायालयाची परवानगी घेऊन वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
विशाल आनंद, जिल्हा पोलिस
अधीक्षक, अमरावती
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





