उद्यापासून कार्यान्वित; सूचना, तक्रारी स्वीकारणार, पाठपुरावाही होणार
अमरावती : १०० दिवसांच्या कार्यक्रमात शासनाने दिशानिर्देश दिले असले तरी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी त्यामधून स्वतंत्र संकल्पना साकारली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद कक्ष गुरुवारपासून स्थापित होत आहे. ही जिल्हाधिकाऱ्यांची वॉररूम राहणार आहे व येथे महसूल विभागाचे कामाच्यासंदर्भात नागरिकांच्या सूचना, तक्रारी स्वीकारल्या जातील व जलदगतीने त्याचा पाठपुरावाही होणार असल्याचे जिल्हाधिकारी कटियार यांनी सांगितले.
प्रशासनाने समस्यांची दखल घ्यावी, ही जनसामान्यांची अपेक्षा असते व याद्वारे सुसंवाद होऊन महसूल विभाग लोकाभिमुख होईल. कार्यवाहीची स्थिती वेळोवेळी समजावी, असे नागरिकांना अपेक्षित असते, तक्रारीसंदर्भात संबंधित विभाग, अधिकारी कोण? याविषयीची अनभिज्ञता असते, त्यामुळे या कक्षाची मोठी उपयोगिता राहणार असल्याचे आरडीसी अनिल भटकर यांनी सांगितले.
नागरिकांच्या सूचना, तक्रारींचे योग्य निवारण व्हावे, फीडबॅक मिळावा, हा वॉररूमचा उद्देश आहे. याद्वारे शासन-प्रशासन लोकाभिमूख होण्यास मदत होईल.
सौरभ कटियार, जिल्हाधिकारी
क्यूआर कोड, व्हॉट्सअॅप नंबर नागरिकांच्या सूचना, तक्रारीसाठी त्यांना येथे येण्याची गरज भासणार नाही. यासाठी क्यूआर कोड देण्यात आला आहे. व्हॉट्सअॅप क्रमांकही दिला जाईल. याद्वारे नागरिक घरबसल्या सूचना, तक्रारी दाखल करू शकतील, त्याची त्वरित दखल घेण्यात येऊन मुदतीत निवारण केले जाईल, यासाठी तंत्रज्ञान वापरले जाईल.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





