Risod Health Camp: रोगमुक्त रिसोड’ आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजीवनी ममता हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत तपासणी

रिसोड  : ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनने, आपल्या अध्यक्ष मा. श्री. मधुसूदन अग्रवाल यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली, ५ व ६ एप्रिल रोजी ‘रोगमुक्त रिसोड’ हे मेगा आरोग्य तपासणी शिबिर  संजीवनी ममता हॉस्पिटलच्या माध्यमातून यशस्वीपणे आयोजित केले. या शिबिरास रिसोड शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिला. मूळचे रिसोडचे रहिवासी आपल्या जन्मभूमीतील जनतेला चांगली आरोग्यसेवा पुरवण्याच्या फाउंडेशनच्या कटिबद्धतेची पुन्हा एकदा प्रचिती आली.

सदर शिबिरामध्ये एकूण ५६० रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये ३३२ पुरुष तर २२८ महिलांचा समावेश होतो. शिबिरात संपूर्ण मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये हाडांचे विकार (ऑर्थोपेडिक्स), कर्करोग (ऑन्कोलॉजी) आणि  डोळ्यांचे आजार (ऑफ्थाल्मॉलॉजी) या फाउंडेशनच्या मुख्य सेवा क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला.

शिबिरातील सर्व ५६० नागरिकांची बीपी, शुगर तपासणी करण्यात आली. हाडांच्या विकारांची तपासणी ज्या मध्ये गुडघा व कूल्हा सांधेदुखी असणाऱ्या एकूण ४८५ रुग्णांची तपासणी करण्यात आली पैकी ७६ रुग्णांचे एक्स-रे करण्यात आले तर ६३ ऋणांवरती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. ३८८ महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली ज्यामध्ये २२८ मॅन्युअल ब्रेस्ट तपासणी, ५४थर्मल मॅमोग्राफी, १४ पॅप स्मीयर चाचणी करण्यात आली.

३८८ डोळ्यांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये ४७ रुग्णांवरती मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये तपासलेल्या सर्व लाभार्थ्यांना मोफत औषधे देण्यात आली, जेणेकरून त्यांचे पुढील उपचार सुरळीत पार पडतील.  शिबिर यशस्वी करण्यासाठी संजीवनी ममता हॉस्पिटल, मुंबई येथील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि सहाय्यक कर्मचारी यांनी अथक प्रयत्नकेले तसेच उत्तमचंद बगडिया महाविद्यालय कर्मचारी व विद्यार्थी, समता फाउंडेशनची कर्मचारी यांनी सहकार्य केले. ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन हे रिसोड व परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगमुक्त समाज घडवण्यासाठी सतत उपक्रम राबवत राहणार असल्याचे प्रतिपादन मधुसूदनजी अग्रवाल यांनी केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013545
error: Content is protected !!