रिसोड :- रिसोड तालुक्यातील गोभणी ग्रामपंचायतवर सुरुवातीपासूनच मा.खा.अनंतराव देशमुख समर्थक पॅनलचे वर्चस्व राहिलेले आहे.या पंचवार्षिक मध्ये सुरुवातीला आपसात ठरल्याप्रमाणे आणि सर्वसाधारण कुटुंबाला संधी मिळावी, या उद्देशाने सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी सौ.सविता शेषराव राऊत नंतरच्या सव्वा वर्षासाठी सौ.अश्विनी संदीप घायाळ यांना संधी देण्यात आली होती व आता उर्वरित कालावधीसाठी सौ.विद्या गजानन सरोदे यांची सरपंच पदी अविरोध निवड करण्यात आली.
एका पंचवार्षिक मध्ये सर्वसाधारण आणि संख्येने कमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना नेतृत्व करण्याची संधी मिळाली
या सभे करिता मा.खा.अनंतराव देशमुख समर्थक भाजपचे सात सदस्य उपस्थित होते व सर्वानुमते निवड झाली. यासाठी जि प सदस्य अमोल भुतेकर, गजाननराव देशमुख, बाजीराव पाटील हरकळ, मोहन हरकळ, मधुकर साबळे, दशरथ पारेकर, शेषराव राऊत, प्रभाकर घायाळ, मनोहर साबळे, उपसरपंच अशोकराव देशमुख, शे.अतीक शे.लतीफ, भीमराव साबळे, ॲड.राजेश साबळे, संदीप घायाळ, नकुलदादा देशमुख मित्र मंडळ आणि गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले. एका पंचवार्षिक मध्ये सर्वसाधारण आणि संख्येने कमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना नेतृत्व करण्याची संधी मिळाली याबद्दल पॅनलचे व गोभणी वासियांचे कौतुक होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





