Homeopathy Jeevan Gaurav Award: गुणवत्तापूर्ण उपचार पद्धतीत होमिओपॅथीचे स्थान महत्त्वाचे: ना. जाधव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

 

बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने स्थापन केलेल्या आयुष विभागांतर्गत गेल्या दहा वर्षांमध्ये विविध कामे केल्या गेलीत आज भारतीय पारंपारिक योग अभ्यासाला जागतीक स्तरावर केल्या जात असून २१ जूनला हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून सर्वत्र साजरा होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव  यांनी सांगून गुणवत्तापुर्ण उपचार पद्धतीत होमिओपॅथीचे स्थान अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.उल्हासनगर येथील  प्रसिद्ध होमिओ तज्ञ डॉ. अमरसिंह गौतम, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पळसखेडा येथील होमिओ तज्ञ डॉ. बाळासाहेब ना. महानोर, डेबको या होमिओपॅथी औषध निर्मिती संस्थेचे प्रमुख नंदकिशोर देशपांडे यांना होमिओपॅथी जीवनगौरव पुरस्कार देऊन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव  यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला बुलढाण्याचे आ. संजय गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जेष्ठ होमिओ तज्ज्ञ तथा पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब कवीश्वर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजित शिरसाट, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. दूर्गासिंग जाधव यांच्यासह युनानी होमिओपॅथी आयुष अंतर्गत काम करणारे डॉक्टर्स उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013545
error: Content is protected !!