सुधाकर परशुराम घारे यांचे राष्ट्रवादि क्रॅाग्रेस पार्टीत पुनच्छ जल्लोषात राजकीय पुनरागमन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खालापुर प्रतिनिधी :- रॅायल गार्डन कर्जत येथे राष्ट्रवादि कॅाग्रेस पार्ट्रीचे नेते सुधाकर परशुराम घारे यांच्या संवाद मेळावा हा राष्ट्रवादि चे कार्यकर्ते व नविन कार्यकर्ते यांच्या पक्ष प्रवेशा सह संपन्न झाला. ह्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष व खासदार सुनील तटकरे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झीरवळ,ईगतपुरीचे आमदार हिरामण खोपकर,ह्या प्रमुख अतीथी च्या उपस्थीतीत जल्लोषात राष्ट्रवादि कॅाग्रेस पार्ट्रीत पुन्हा एकदा राजकीय पुनरागमन करुन सुधाकर घारे यांना बळ देऊन विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा नीर्धार केला. ह्या संवाद मेळाव्यात सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक पक्षातील नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांचा पक्ष प्रवेश देखील झाला. शेतकरी कामगार पक्षाचे नेते नारायण डामसे,कर्जत पंचायतसमीती चे माजी उपसभापती जैय‌वंती हिंदोळा,महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जील्हा उपाध्यक्ष सचिन कर्णुक,शिवसेना युवासेना उत्तर रायगड जिल्हा प्रमुख देवेन्द्र देशमुख,उबाठा शिवसेना खोपोली शहर प्रमुख जुनेद पठाण,ह्यांचे अनेक कार्यकर्त्यांसह ह्या वेळि पक्ष प्रवेश झाला. ह्या प्रसंगी तटकरे साहेबांना कर्जत रेल्वे स्थानकाला कर्जत तालुक्यातील थोर हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव देण्यात यावे असे लिखीत निवेदन देण्यात आले. तसेच कर्जत तालुका हा आदिवासी बहुसंख्य असल्याने आदिवासी भवन निर्माण करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले.
सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे हे चमत्कार करणारे नेते आहेत. पराभवाला सामोरे जाऊन पुन्हा जनतेत येउन जनतेची कामे करत आहेत. सुधाकर घारे एकटे नाहीत,अजित दादा पवार ह्यांच्या समवेत संपुर्ण राष्ट्रवादि कॅाग्रेस पक्ष त्यांच्या बरोबर आहे. राज्यातील 1 नंबर चे पक्ष कार्यालय हे कर्जत मध्ये आहे व त्या कार्यालयात सामान्य माणसांचे ‌व कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यात येतात. ह्या प्रसंगी सुनील तटकरे यांनी संपुर्ण सभेला उद्देशुन सुधाकर घारे यांच्या साठि एक प्रभावि वक्तव्य केले कि पुन्हा तालुक्यात ज्या वेळी मी येईन त्यावेळी तुमच्या आनंदाला उधाण आलेला असेल व तो दिवस फार लांब नाहि.
ह्या कार्यक्रमात भरपुर मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थीती होती. व्यासपीठावर नेते मधुकर पाटील,दत्तात्रेय मसुरकर,अशोक भोपतराव,भरत भाई भगत,भगवान भोईर,उमा मुंडे,अंकित साखरे,संतोष बैलमारे,शरद कदम व अनेक कार्यकर्ते हे कर्जत खालापुर मधुन आले होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013544
error: Content is protected !!