परभणी/गंगाखेड शहरातील घटना; एकावर गुन्हा दाखल
परभणी/गंगाखेड : देव घरात असलेल्या पेटीत ठेवलेल्या लाख रुपयांच्या रक्कमेवर नोकरानेच डल्ला मारला. ही घटना २ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ५ या दरम्यान गंगाखेड शहरातील गोदातट भागात घडली. या प्रकरणी ११ एप्रिलला एकावर गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल राजेंद्र यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या घरात नितीन भगवान गायकवाड हा नोकर आहे. याने फिर्यादीच्या देवघरात असलेल्या पेटीतील १ लाख रुपयांची रोकड चोरुन नेली. चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.ह. माहोरे करत आहेत.
मंदिरातुन दानपेटी चोरुन नेली
परभणी : तालुक्यातील पिंगळी येथे असलेल्या पिंगळेश्वर महादेव मंदिरातुन दानपेटी चोरुन नेत त्यातील ४५ हजाराची रोकड लंपास करण्यात आली. ही घटना १० एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. सदर प्रकरणी गजानन दामोधर यांच्या तक्रारीवरुन कपिल सावंत, संजय सावंत या दोघांवर ताडकळस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि. आचार्य करत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





